वार्ताहर / शाहूपुरी :
पुरवठा विभागाचे थकलेले अनुदान उपलब्ध झाल्याने त्यामधून दिवाळीसाठी केशरी कार्डधारकांना स्वस्तात गहू व तांदूळ देण्यात येणार आहेत. त्यासाठी धान्य कोटाउचलण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सुरू केली आहे. दिवाळीपर्यंत हे धान्य उपलब्ध होईल.
अनुदानाची कमतरता असल्याने स्वस्तातील धान्य उपलब्ध होऊ शकतनव्हते. तर नोव्हेंबरपासून रेशनवरील सर्व प्रकारचे धान्य बंद करण्याची तयारी शासनाने केली आहे. केवळ पंतप्रधान योजना व अंत्योदयच्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळणार आहे.आता तर आयुक्तांनी रेशनकार्डची तपासणीची मोहीमच हाती घेण्याची सूचना पुरवठा विभागाला केल्याने केशरी कार्डवर असलेल्या श्रीमंतांची नावे आपोआप कमी होऊन खऱ्या लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होऊ शकणार आहे.
कोरोना संकटाच्या काळात रेशनवरील धान्याचा सर्वच लाभार्थ्यांना लाभ झाला. पण, कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात झालेल्या खर्चामुळे शासनाकडे पुरेसे अनुदान नसल्याने धान्य वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. तरीही दिवाळी सणाच्या काळात नागरिकांची नाराजी होऊ नये, यासाठी रेशनवर धान्य उपलब्ध करण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यास सुरवात केली आहे.त्यानुसार पुरवठा विभागाला साडेसात कोटींचे अनुदान उपलब्ध झाले आहे. या अनुदानातून दिवाळीपर्यंत कोणतेच धान्य न मिळणाऱ्या केशरी कार्डधारकांना स्वस्तात धान्य उपलब्धकेले जाणार आहे. यामध्ये 8 रुपये किलो दराने गहू व 12 रुपयेकिलो दराने तांदूळ उपलब्ध केला जाणार आहे.