बेळगाव : दसरा सणानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले असून कोरोनाच्या काळात बुडालेला महसूल भरून काढण्यासाठी परिवहन प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. दिवाळीसाठी आपल्या गावी परतणाऱया प्रवाशांना बेळगाव बसस्थानकातून विशेष बस धावणार आहेत. दिवाळी सणाच्या चार दिवसआधी ही विशेष बससेवा मुंबई, पुणे या शहरांकडे धावणार आहेत. अनलॉकमध्ये अनेक निर्बंध शिथिल झाले असले तरी रेल्वेगाडय़ा मर्यादित संख्येत धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनामुळे परिवहनचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. आता राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू आहे. दिवाळीनिमित्त बेंगळूर, मुंबई, पुणे, पणजीहून बेळगावकडे येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी बेळगाव बसस्थानकातून मुंबई, पुणे शहरांकडे जाणाऱया बसफेऱया वाढविण्यात येणार आहेत.


previous post