Tarun Bharat

दिवाळीपुर्वी सीपीआरमध्ये नॉन कोरोना रूग्णांना सेवा

50 टक्के वॉर्डमध्ये अन्य रूग्णांवर उपचार, कोरोना, नॉन कोरोनासाठी स्वतंत्र ओपीडी
उपलब्ध मनुष्यबळावर नियोजन सुरू, सीपीआर हॉस्पिटलमध्ये सॅनिटायझेशनसाठी हालचाली गतिमान

प्रतिनिधी / कोल्हापूर

येथील सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे. जिल्हा प्रशासनाने हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीपुर्वी सीपीआर हॉस्पिटलमध्ये नॉन कोरोना रूग्णांना उपचाराची सुविधा मिळणार आहे. कोरोना, नॉन कोरोना रूग्णांसाठी येथे स्वतंत्र बाहÎरूग्ण तपासणी विभाग असणार आहेत. हॉस्पिटलकडून उपलब्ध मनुष्यबळावर त्याचे नियोजन सुरू आहे. सीपीआरमध्ये सॅनिटायझेशनसाठी हालचाली सुरू आहेत. सप्ताहभरात अन्य रूग्णांवर येथे उपचार होणार आहेत.

 सीपीआरच्या 650 बेडच्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. कोरोनाची साथ आल्याने 1 मार्चला हे जिल्हा रूग्णालय कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल झाले. अन् येथील सर्व रूग्णांना लाईन बाजार येथील सेवा रूग्णालय आणि अन्य जीवनदायी योजनेंतील सहभागी हॉस्पिटलमध्ये वर्ग करण्यात आले. 1 मार्चपासून 8 महिना सीपीआर हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना, संशयित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे कम्युनिटी स्प्रेडच्या काळात उपलब्ध 450 बेडवर रूग्ण उपचार घेत होते. रूग्णांना बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत होती, पण साथ नियंत्रणात आल्याने रूग्णसंख्या घटली आहे. त्यातूनच सीपीआरमध्ये रिकाम्या बेडची संख्या वाढली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रूग्णसंख्या घटल्याने केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर बंदचा निर्णय घेतला. कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये 50 टक्के नॉन कोरोना रूग्णांवर उपचाराचा निर्णय घेतला. आयजीएम, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात नॉन कोरोना रूग्णांवर सोमवारी उपचार सुरू झाले, पण सीपीआर हॉस्पिटलमध्ये हा निर्णय समितीवर सोपवला होता. समितीची सायंकाळी बैठक झाली. बैठकीत दिवाळीपुर्वी 50 टक्के हॉस्पिटल नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले करण्याचा निर्णय झाला.

सीपीआरमध्ये दुधगंगा इमारतीतील 200 बेड हे कोरोना रूग्णांसाठी राखीव  आहेत. ही इमारत वगळता अन्य इमारतींचे सॅनिटायझेशन करून तेथे नॉन कोरोना रूग्णांवर उपचार होणार आहेत. कोरोना व नॉन कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र बाहÎरूग्ण विभाग असणार आहे. उपलब्ध मनुष्यबळाचे दोन विभागात नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीपुर्वी सीपीआरमधील 50 टक्के हॉस्पिटलमध्ये नॉन कोरोना रूग्णांवर उपचार होणार असल्याची माहिती सीपीआरमधील वैद्यकीय अधिक्षक डॉ. बडे यांनी दिली.

इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये नॉन कोरोना रूग्ण तपासणी सुरू
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात सोमवारपासून नॉन कोरोना रूग्ण तपासणी सुरू झाली. तसेच येथील 50 टक्के वॉर्ड नॉन कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

Related Stories

इचलकरंजीत गुटखा, सुंगधी तंबाखूची वाहतुक करणारी कार पकडली

Archana Banage

कोल्हापूर : समर्थ साकारणार ‘बाल जोतिबा’ची भूमिका

Archana Banage

आईने मित्रांना घरी जेवायला बोलवण्यास नकार दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

रूग्णवाहिका लावायची असेल तर पावती फाडा

Archana Banage

खासदार मंडलिकांच्या घरावर सोमवारी मोर्चा

Abhijeet Khandekar

मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल गुन्हेगार अटकेत

Archana Banage