Tarun Bharat

दिवाळीपूर्वी 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडविण्याची धमकी

ऑनलाईन टीम / लखनऊ :

दिवाळीपूर्वी उत्तरप्रदेशातील 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी तशी चिठ्ठी हापुड रेल्वे स्थानकाच्या अधिक्षकांना पाठवली आहे. त्यामुळे एकच खबळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हापुड रेल्वे स्थानकांच्या अधिक्षकांना शनिवारी रात्री उशिरा एक चिठ्ठी प्राप्त झाली. ही चिठ्ठी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटेनेकडून आली असून, त्यामध्ये उत्तरप्रदेशातील 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीपत्रात लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, कानपूर आणि गोरखपूरसारख्या अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची नावे आहेत. संबंधित चिठ्ठीची माहिती अधिक्षकांनी सुरक्षा विभागाला दिली असून, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जीआरपी, आरपीएफ आणि डॉग स्कॉड देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांचीही कसून तपासणी केली जात
आहे. तसेच ट्रेनमधील पहारा वाढविण्यात आला आहे.

Related Stories

दहा लाख नोकऱया, गॅस सिलिंडर पाचशे रुपये

Patil_p

कोल्हापूर : अश्‍विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

Archana Banage

स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचे यशस्वी परीक्षण

Patil_p

भारतीयांच्या आयुष्यात कोरोनामुळे दोन वर्षांनी घट

Archana Banage

तुनिषा शर्माची आत्महत्या लव्ह जिहाद असेल तर…भाजप आमदार राम कदम यांचा इशारा

Abhijeet Khandekar

लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक; मुंबई, ठाण्यात आंदोलन

Tousif Mujawar