Tarun Bharat

दिवाळीमुळे ड्रायपुट्सच्या खरेदीत वाढ

फराळामध्येही ड्रायप्रुटसचा वापर होत असल्याने मागणी : ड्रायप्रुट्सच्या दरात काहीशी वाढ मात्र जनतेतून खरेदीचा उत्साह

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे खरेदीचा उत्साह वाढला आहे. या वषीची दिवाळी ही आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ड्रायप्रुट्सची भेट आपल्या मित्रमंडळींना द्यावी या उद्देशाने मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात आहे. याचबरोबर फराळामध्येही ड्रायप्रुटसचा वापर केला जात असल्याने खरेदीसाठी महिलावर्ग दाखल होत आहे. यावषी ड्रायप्रुट्सच्या दरात काहीशी वाढ झाली असली तरी खरेदीचा उत्साह मात्र तोच आहे.

दिवाळीच्या खमंग फराळामध्ये ड्रायप्रुटसचा वापर सर्रास होतोच. लाडू, चिवडा यासह इतर फराळांमध्ये सुक्मया मेव्याचा वापर होतो. दिवाळीसाठीच्या मिठाईमध्येही ड्रायप्रुट्सचा वापर आवर्जुन केला जातो. दरवषी विविध कंपन्या, संस्था यांच्याकडून कर्मचारी व इतर नागरिकांना भेटवस्तू म्हणून ड्रायप्रुट्सचे पॅकेट दिले जातात. यावषी ड्रायप्रुट्सचे तयार बॉक्स 200 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत बेळगावच्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सुटे ड्रायप्रुट्स व तयार बॉक्स खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.

बदाम घसरला, पिस्ता वधारला

बदामाचे दर दोन महिन्यांपूर्वी प्रति किलो 1100 च्या वर गेले होते. परंतु हाच दर आता 800 ते 900 रुपयांवर आला आहे. बदामाच्या दरात 30 टक्क्मयांची घट झाली आहे. पिस्त्याच्या दरात मात्र या वषी वाढ झाली आहे. सध्या पिस्ता 950 ते 1060 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पिस्त्यापेक्षा बदामाला मागणी वाढल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. 

अफगाणी ड्रायपुट्सच्या दरात वाढ

भारतात अफगाणिस्तान येथून मोठय़ा प्रमाणात ड्रायप्रुट्सची आयात होते. अक्रोड, अंजीर, काळय़ा मनुका, खजूर असा विविध सुकामेवा अफगाणिस्तान येथून मागविला जातो. यावषी तालिबानने अफगाणिस्तानवर आपले वर्चस्व मिळविले असून, तेथे संघषपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम ड्रायप्रुट्सच्या निर्यातीवर झाला आहे. यामुळे भारतात ड्रायप्रुट्सच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

असे आहेत ड्रायप्रुट्सचे दर (प्रति किलो)

  • बदाम             800 ते 900
  • पिस्ता             950 ते 1060
  • अक्रोड             1100 ते 1200
  • काजू                700 ते 1200
  • अंजीर              1000 ते 1200
  • मनुके              240 ते 280

खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

कोरोनामुळे नागरिक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष पुरवत आहेत. त्यामुळे ड्रायप्रुट्सची खरेदी चांगल्या प्रकारे सुरू आहे. दिवाळीसाठी परदेशामधूनही अनेक ड्रायप्रुट्स उपलब्ध झाले असून, खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अफगाणिस्तान येथे सुरू असलेल्या तालिबानी हल्ल्यांमुळे याचा परिणाम भारतात येणाऱया ड्रायप्रुट्सवर झाल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

– प्रेम राजपुरोहित (राज पुरोहित ड्रायप्रुट्स)

Related Stories

किणये ग्रा. पं. मध्ये नवीन चेहऱयांना संधी

Patil_p

विद्युत रोषणाईमुळे प्रशासकीय इमारतीने वेधले लक्ष

Amit Kulkarni

लोंढा येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

Omkar B

वाळूच्या डंपरखाली सापडून गिरगावचा दुचाकीस्वार ठार

Patil_p

सलग दुसऱया दिवशीही दोनशेचा आकडा पार

Tousif Mujawar

हर घर तिरंगासाठी स्वच्छता कामगारांना ध्वज

Omkar B