Tarun Bharat

दिवाळी अंकातून तरुण भारत’ने वाचकांची अभिरूची वाढविण्याचे काम केले – प्र-कुलगुरू

दर्जेदार लेखनामुळे वाचकांची दिवाळी समृध्द होईल

प्रतिनिधी / कोल्हापूर

दिवाळी अंकाच्या माध्यमातून तरुण भारत'ने वाचकांची अभिरूची वाढविण्याचे काम केले आहे. विविध विषयांना स्पर्श करणारातरुण भारत’चा यंदाचाही दिवाळी अंक वाचकांना समृद्ध करणारा ठरेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले. तरुण भारत'च्या 2021 च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरूवारी येथील दसरा चौकातील कार्यालयात प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते आणितरुण भारत’ परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत झाले.

देशातील प्रतिथयश शास्त्रज्ञ असणारे प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, तरुण भारत'ने दैनिकाच्या माध्यमातून परखड आणि निर्भीड भूमिका घेत बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रात लौकिक संपादन केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कालसुसंगत बातम्या देत नवनवीन प्रयोगही केले आहेत. दिवाळी अंकाच्या परंपरेतहीतरुण भारत’ने आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. आजच्या ऑनलाईन, डीजिटलच्या काळात सकस लेख असणारा परिपूर्ण दिवाळी अंक वाचकांना दिला आहे. कथा, कविता, परिसंवाद, व्यक्तीपरिचय, व्यंगचित्रे आणि राशीभविष्य असा सर्वांगसुंदर दिवाळी अंक निश्चितपणे वाचकांच्या पसंदीस उतरेल, असा विश्वासही प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

तरुण भारत'चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनीतरुण भारत’च्या शतक महोत्सवी वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, संस्थापक बाबुराव ठाकुर यांनी 1919 मध्ये तरुण भारत'ची स्थापना केली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढÎात आणि स्वातंत्र्योत्तर काळाततरुण भारत’ने चळवळीतील वृत्तपत्र म्हणून लौकिक आणि विश्वास संपादन केला. दैनिकाबरोबरच दरवर्षी वैशिष्टÎपूर्ण दिवाळी अंकही वाचकांना देण्याची परंपरा जपली आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून नवोदित, युवा लेखक, कवी यांना संधी दिली. त्यातून असंख्य लेखक, कवी घडले आहेत, असेही साळुंखे यांनी सांगितले. स्वागत, प्रास्ताविक मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांनी केले.

यावेळी तरूण भारतचे जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य उपसंपादक यशवंत लांडगे, वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशीद, जाहिरात मांडणी विभागप्रमुख विजय शिंदे, वितरण विभागप्रमुख सचिन बरगे, डी. टी. पी. विभागप्रमुख महादेव पाटील, प्रॉडक्शन इन्चार्ज राजू नंदगडकर आदी उपस्थित होते.

Related Stories

चारचाकी पलटी होऊन सहाजण जखमी; दोघे गंभीर

Abhijeet Khandekar

म्हासुर्ली – चौधरवाडी बंधाऱ्याची दुरुस्तीनंतर सहा महिन्यातच पडझड

Archana Banage

नगरपालिकांमधून दिव्यांगांना मिळणार दुकानगाळे

Patil_p

सीरमकडून ‘कोविशिल्ड’ लसीचे दर निश्चित; सरकारी, खाजगी रुग्णालयांसाठी असणार ‘हे’ दर

Tousif Mujawar

महाराष्ट्रात कोरोनाचा टक्का वाढला; सक्रीय रुग्णसंख्या 3 लाख 36 हजारांवर

Archana Banage

विनापरवाना पिस्तुल, अंमलीपदार्थप्रकरणी तिघांना अटक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!