Tarun Bharat

दिवाळी सणासाठी चावडी बाजार फुलला

Advertisements

प्रतिनिधी /काणकोण

कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी दिवाळीच्या सणांवर पडलेले विरजण यंदा भरून काढण्याच्या तयारीत काणकोणचे नागरिक गुंतलेले आहेत. चावडी बाजार आकाश कंदील विविध प्रकारच्या पणत्यांनी फुलला असून गोवा बागायतदार, अन्य किराणा मालाची दुकानात ग्राहकांची जशी गर्दी वाढत आहे.

आकाश कंदील, पणत्या आणि अन्य सामुग्रीच्या खरेदीसाठी देखील लोक आता गर्दी करायला लागले आहेत. या तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या देखील आता कमी व्हायला लागली असून सद्या या तालुक्यात केवळ 4 सक्रीय रूग्णांची नोंदणी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या एक दोन दिवसांत ही संख्या शून्यावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मागच्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे मात्र या ठिकाणच्या युवक वर्गाकडून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. या भागातील युवक मंडळे नरकासूर प्रतिमा करायला गुंतलेले असून बहुतेक ठिकाणच्या नरकासूर प्रतिमा तयार झालेल्या आहेत. या मतदारसंघातील माशे येथील निराकार मैदान, पैंगीण येथील पोटके मैदान, नगर्से या भागात नरकासूर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून असाच पाऊस पडत राहिल्यास मात्र या स्पर्धांवर परिणाम होण्याची भीती युवक मंडळांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

जुने गोवे, आग्वाद येथे उद्या योग प्रात्यक्षिके

Amit Kulkarni

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काणकोण भाजपतर्फे आदरांजली

Amit Kulkarni

भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायला हवे

Amit Kulkarni

मुरगावात होणार अत्त्याधुनिक पर्यटक क्रूझ टर्मिनल

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाचा नववा बळी

Patil_p

राज्यपालांच्या गौप्यस्फोटाने मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उघड

Amit Kulkarni
error: Content is protected !!