Tarun Bharat

दिवाळी सुट्टी कमी करणाऱया शासन आदेशाची होळी

प्रतिनिधी/ खेड

दरवर्षाच्या नियोजनाप्रमाणे माध्यमिक शाळा संहिता व नियमानुसार सुट्टी देणे आवश्यक असताना शाळा कर्मचाऱयांना सुट्टी देण्याबाबत घेतलेल्या शासन निर्णयाची जिल्हा शिक्षक भारतीने ठिकठिकाणी होळी करत तीव्र संताप व्यक्त केला.

माध्यमिक शाळांसाठी लागू असलेल्या शाळा संहितानुसार एका शैक्षणिक वर्षात 76 सुट्टय़ा देणे बंधनकारक आहे. यातील 18 दिवसांपर्यंत दिवाळी सुट्टीचा समावेश आहे. मात्र शासनाने कोरोनाचे कारण दाखवत केवळ 5 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामध्येही 3 शासकीय सुट्टय़ांचा समावेश आहे. वास्तविक मार्च माहिन्यापासून जाहीर झालेल्या लॉकडाऊननंतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी कोविड डय़ुटी करत आहेत. मे महिन्यात लॉकडाऊन व कोविड डय़ुटीमुळे कर्मचाऱयांना मुख्यालय सोडता आलेले नाही. शिवाय 15 जूनपासून आतापर्यंत अखंडपणे शक्य त्या बाबींचा वापर करत ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी प्रशालेत कार्यरत आहेत. या सर्व बाबी पाहता शिक्षण विभागाने नियमानुसार 18 दिवसांची सुट्टी जाहीर करणे आवश्यक हेते. मात्र शासनाने अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक भारतीने आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे जिल्हय़ात तीव्र पडसाद उमटले. कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील, कार्यवाह नीलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर शासन आदेशाची होळी करत निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, कार्यवाह पोपट जगताप, माध्यमिक पतपेढीचे संचालक अमित कदम, धनाजी मिरगणे, महेश बोधे उपस्थित होते.

                                 दिवाळी सुट्टीबाबत परिपत्रकाची होळी

दापोली: शालेय शिक्षण विभागातील उपसचिवांच्या परिपत्रकानुसार दिवाळी सुट्टी 12 ते 16 नोव्हेंबर अशी केवळ 5 दिवसांची करण्यात आली आहे. शुक्रवारी या परिपत्रकाची होळी करत निषेध करण्यात आल्याची माहिती हर्णेतील शिक्षक भारती उर्दूचे राज्यप्रमुख कार्यवाह मुबीन बामणे यांनी दिली. शासनाने हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे व दिवाळीची सुट्टी किमान 12 दिवसांची करावी, अशी मागणी बामणे यांनी केली आहे.

                 दिवाळी सुट्टी रद्दचा आदेश खेदजनक

 रामपूर: शाळा संहितेमधील नियमांचा चुकीचा अर्थ लावून दीपावलीची सुट्टी रद्द करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. शासनाचा हा आदेश खेदजनक असून तो तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना करण्यात आल्याचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले. शासनाने प्रत्येक जिह्यात पूर्वनियोजित स्वरूपामध्ये असणारी दिवाळीची सुट्टी मंजूर करावी, अशी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची आग्रही मागणी असल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

                  शाळा कर्मचाऱयांच्या सुट्टीत बदल

शासनाने कोरोनाचे कारण दाखवत शाळा कर्मचाऱयांना केवळ 5 दिवसांची सुट्टी जाहीर केल्याने राज्यभरासह जिल्हय़ात विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. याची दखल घेवून राज्याच्या शिक्षण विभागाने दिवाळीतील सुट्टीत बदल करून ती आता 7 ते 20 नोव्हेंबर अशी राहणार असल्याचे सुधारित परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.

Related Stories

आंबा बागायतदारांकडून समस्येचे संधीत रुपांतर

Patil_p

‘आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत रेशनकार्ड धारकांना शिधा वाटप

Anuja Kudatarkar

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक भास्कर सावंत यांचे निधन

NIKHIL_N

”कला भवन प्रकल्प म्हणजे कुठ्ठाळी आणि गोव्यासाठी एक आदर्श प्रकल्प”

Abhijeet Khandekar

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Anuja Kudatarkar

गुहागर येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

Archana Banage