Tarun Bharat

दिविज शरण-सिटॅक उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ ऑकलंड

भारताचा दिविज शरण व त्याचा साथीदार आर्टेम सिटॅक यांनी अग्रमानांकित जॉन पीअर्स व मायकेल व्हीनस यांना पराभवाचा धक्का देत एटीपी एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

दिविजय-सिटॅक यांनी ऑस्ट्रेलियन-किवी जोडीवर 7-6 (7-4), 7-6 (7-3) अशी मात करीत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. दिविज-सिटॅक यांची पुढील लढत सँडर गिले व जोरान व्हीलीजेन यांच्याशी होणार आहे. सँडर-जोरान यांना लिओनार्दो मेयर व जोआव सौसा यांच्याकडून पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. याशिवाय रोहन बोपण्णा व फिनलंडचा हेन्री कोन्टिनेन या तिसऱया मानांकित जोडीनेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. त्यांनी वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या कॅमेरॉन नोरी व ऱहेट पर्सेल यांचा 6-4, 6-2 असा पराभव केला. त्यांची लढत ल्युक बाम्ब्रिज व बेन मॅक्लाच्लन यांच्याशी होणार आहे.

Related Stories

शकीब अल हसनचे संघात पुनरागमन

Patil_p

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी साताऱ्यातील तिघांची निवड

datta jadhav

इस्त्रायलच्या ऍथलिटविरुद्ध लढण्यास नकार, ज्युडोका नौरिन निलंबित

Patil_p

ऍक्सेलसेनला धक्का देत लक्ष्य सेन अंतिम फेरीत

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

त्रिपाठी-अय्यरच्या वादळात मुंबई इंडियन्सचा धुव्वा

Amit Kulkarni
error: Content is protected !!