Tarun Bharat

दिव्यांग व्यक्तींनी केली मतदानाची जनजागृती

प्रतिनिधी / बेळगाव

लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून जनजागृती करण्यात येत आहे. सरकारी विभागातर्फे ही जनजागृती करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्हा स्वीप समिती आणि दिव्यांग यांच्या संयोजनातून ही जनजागृती करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रत्येक नागरिकांनी मतदानाची जबाबदारी घ्यावी आणि लोकशाही बळकट करावी, असा नारा देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी ध्वज दाखवून रॅलीला चालना दिली. या रॅलीमध्ये दिव्यांग व्यक्ती दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. यावेळी मतदान जागृतीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Related Stories

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Patil_p

रोहयो कामगारांना शंभर दिवस काम द्या

Amit Kulkarni

महाराष्ट्रातील सर्व खासदारांना भेटणार

Amit Kulkarni

येळ्ळूरच्या ‘त्या’ जवानावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Patil_p

रेल्वेच्या हुबळी विभागाला 1 कोटीचा महसूल

Patil_p

आशा कार्यकर्त्यांची समुदाय आरोग्य केंद्रासमोर निदर्शने

Patil_p