Tarun Bharat

दिव्यांग संघटना पालिकेसमोर करणार आंदोलन

प्रतिनिधी / सातारा :

दिव्यांगाना घरफळय़ामध्ये 50 टक्के सुट देण्यात यावी, दिव्यांग व्यवसाय झोन करण्यात यावा, दिव्यांगांना 5 टक्के प्रतिवर्षी निधी देण्यात यावा, या मागणांसाठी सातारा पालिकेसमोर दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने दि. 26 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दिव्यांग संस्थेला कॉन्ट्रक्ट बेसवर साफसफाईचे कॉन्ट्रक्ट मिळावे, नगरपालिकेतील दिव्यांग विभाग पहिल्या मजल्यावर करण्यात यावा, सातारा शहरातील सर्व दिव्यांगांची नोंद करण्यात यावी, 2019 नंतरचा दिव्यांग निधीची माहिती लाभार्थ्यांच्या नावासह देण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या वस्तू दिल्या आहेत. त्याची व महागाई भत्त्याची यादी मिळावी, नगरपालिका हद्दीतील दिव्यांग बाथरुमच्या खर्चाची माहिती मिळावी, अशी मागणी केलेली आहे. ही माहिती मागवल्याने सातारा नगरपालिकेतल्या काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच तंतरली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना गाढव भेट देण्याचे आंदोलन स्थगित

दिव्यांगांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हाधिकाऱ्यांना गाढव भेट देणार होती. हे आंदोलन दि.17 रोजी करण्यात येणार होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आंदोलनकर्ते प्रहारचे राज्य प्रवक्ते शंभुराज खलाटे व अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे यांच्याशी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी सपना घोलळे यांच्यामार्फत संपर्क साधून बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे अमोल कारंडे यांनी सांगितले.

Related Stories

म्हसवडलाच एमआयडीसी होणार

Archana Banage

सातारा : रणजित देशमुख यांचे औद्योगिक प्रकल्प राज्याला दिशा देणारे : माजी मंत्री राजेंद्र मुळक

Archana Banage

कास पठारवरील पर्यटकांचा ओघ ओसरला

Patil_p

एकवीस झिरो अन् आबा हिरो

Patil_p

ग्रामपंचायत निवडणुकीची उद्यापासून रणधुमाळी

Patil_p

रान डुक्कराच्या मांस विक्री प्रकरणी महिलेवर वनविभागाची कारवाई

datta jadhav