Tarun Bharat

दिव्यांग-सर्व्हिस बसपास मागणीत वाढ

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासधारकांची संख्यादेखील वाढली आहे. शिवाय दिव्यांग व सर्व्हिस बसपासच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे बसपास विभागात बसपाससाठी वर्दळ वाढलेली पाहायला मिळत आहे.

परिवहन मंडळाकडून अंध, दिव्यांगांना वर्षभरासाठी सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, यंदा संपूर्ण बसपासची प्रक्रिया बदलण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांना बसपास मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यंदा बसपास प्रक्रिया ऑनलाईनद्वारे सुरू आहे. बसपाससाठी सेवा सिंधू संकेतस्थळावर अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर कागदपत्रांची रितसर छाननी करून बसपास उपलब्ध करून दिला जात आहे.

नोकरदारवर्गाची संख्याही अधिक

सर्व्हिस बसपासच्या आधारे प्रवास करणाऱया नोकरदारवर्गाची संख्याही अधिक आहे. बसस्थानकातून गोवा, कोल्हापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुबळी, धारवाड, बैलहोंगल असा रोजचा प्रवास करणाऱया सर्व्हिस बसपासधारकांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱयाच कालावधीसाठी बससेवा बंद होती. बससेवा बंद राहिल्याने सर्व्हिस बसपासला स्थगिती मिळाली. दरम्यान, दिव्यांगांना बसपास असूनही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र, आता विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे बसपासच्या मागणीत वाढ झाली आहे. बसपास विभागात सर्व्हिस बसपास मिळविण्यासाठी शनिवारी नोकरदारांची वर्दळ वाढली होती. विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती यांना सर्व्हिस बसपास उपलब्ध करून दिले जात असल्याने परिवहनच्या महसुलातही वाढ झाली आहे.

कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, आता स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या बस व वातानुकूलित बससेवाही सुरळीत सुरू झाल्याने परिवहनची आर्थिक स्थिती रुळावर येत आहे.

Related Stories

कपिलेश्वर मंदिरात नवचंडी होम

Patil_p

खानापूरसाठी 22 कोटींची पाणी योजना मंजूर

Amit Kulkarni

जीएसएस पीयु कॉलेज विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन

Amit Kulkarni

बिम्स हॉस्टेलच्या डेनेजचे पाणी अनेकांच्या घरात

Amit Kulkarni

कोथिंबीरसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

Amit Kulkarni

20 लाखाच्या रोकडसह चौघे ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!