Tarun Bharat

दिशाभूल करण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

प्रतिनिधी/ मेढा

जावली सहकारी बँकेच्या कर्ज थकबाकीदारांचे कुटुंबीयांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिशाभूल करण्यासाठी आत्मदहनाच प्रयत्न केला असून त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. आज रोजी ते बँकेचे थकबाकीदार असून त्यांनी कोणाला पैसे दिले यांच्याशी बँकेला काही घेणे देणे नाही. ज्यांना दिले त्यांच्याकडून त्यांनी वसूल करावे. मात्र ह.भ.प कळंबे महाराजांनी लाखो सभासदांचा विश्वास संपादीत करून उभ्या केलेल्या जावली बँकेला बदनाम करू नये, असा इशारा बँकेचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी दिला आहे.

नलावडे कुंटुंबीयांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी वसंतराव मानकुमरे, बँकेचे चेअरमन चंद्रकांत गावडे (पाटील), व्हा. चेअरमन श्री. म्हस्कर व सर्व संचालकांच्या उपस्थीत पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्या प्रसंगी श्री. मानकुमरे, चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालकांनी त्यांच्या कृत्याचा निषेध केला. 

मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिह्यात कार्यरत असलेल्या व सहकारी बँकिंग व्यवसायात दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेला मानाचे स्थान आहे. सातारा शाखेतील कर्ज थकबाकीदार नलावडे कुटुंबीय यांनी दि. 15 ऑगस्ट, 2020 रोजी देशाच्या 74 व्या स्वातंत्रदिनी जिह्यातील प्रशासकीय यंत्रणा सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे आपले कर्तव्ये बजावत गुंतलेली असताना, जिल्हाधिकारी कार्यकायासमोरच आत्मदहनाचा केलेला प्रयत्न हे सहकारी बँकिंग व्यवसायावर घाला घालणारे आहे. त्यामुळे बॅंकेची स्वच्छ प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगीतले.

    बँकेच्या सातारा शाखेचे कर्ज थकबाकीदार मे. प्रेंड्स कम्युनिकेशन , मे. प्रेंड्स इंटरप्रासेस व श्री विशाल नलावडे यांनी बँकेकडून रुपये 3 कोटी 10 लाख इतकी मोठी कर्ज घेतली आहेत.  सदर कर्जाची नियमित परतफेड होत नसल्याने  ब्रयाच कालावधीपासून कर्ज खाती एन. पी . ए. मध्ये आहेत.  बँकेने कर्ज वसुलीची कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली आहे. तसेच  सदर कर्जदारानी बँकेकडे कर्जासाठी तारण दिलेली काही मालमत्तांची बँकेच्या पूर्व परवानगी शिवाय परस्पर विक्री केलेली होती. थकीत कर्जदाराला बँकेने तारण व्यवस्थेमध्ये असलेल्या अनियमितते बाबत पूर्तता करण्याची केलेली विनंती मान्य न केल्याने बँकेने तारण मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी मा. सहाय्यक जिल्हा निबंधक कार्यालयाकडे अर्ज सादर करून वसुलीची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यामुळे  संबंधित कर्जदारानी कर्ज वसुलीच्या कामात अडथळे निर्माण व्हावेत या हेतूनेच बँकेची बदनामी व  दिशाभूल करण्याच्या उद्धेशाने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे जावली बँक संचालक व व्यवस्थापनाचे म्हणने आहे. 

    जावली बँक व्यवस्थापन हे कर्जदारापेक्षा ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी सातत्याने सर्वच्च प्राधान्य देत आली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी दिलेले निर्देशांचे बँकेने काटेकोरपणे पालन केले असून कर्जदारांना या कालावधीत कर्ज भरण्यासाठी कोणतीही सक्ती बँकेने केलेली नाही.   

   एक संत महात्म्याने स्थापन केलेल्या बँकेची  जनमानसात  चांगली अशी स्वच्छ प्रतिमा असताना बँकेच्या सातारा शाखेतील कर्जदाराने प्रसार माध्यमांची दिशाभूल करीत संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. नलावडे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून  बँक व्यवस्थापणाने गेली दहा दिवसापासून मा. सहकार आयुक्त व निबंधक यांचे कार्यालय पुणे, मा . साहाय्यक जिल्हा निबंधक सातारा,  मा. वरिष्ठ पोलीस अधिक्षक,  सातारा शहर,  यांचे कार्यालयात  खुलासे सादर केलेले आहेत. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या कर्जदार जमीनदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत बँक व्यवस्थापण ठाम असून बँक आर्थिक दृष्टय़ा सक्षम असल्याने बँकेचे खातेदार, सभासद व हीतचिंतक यांनी वृत्तपत्रे व प्रसारमाध्यम यातील बातम्यांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये. असे आवाहन यावेळी वसंतराव मानकुमरे , चेअरमन चंद्रकांत गावडे , व्हा. चेअरमन श्री. म्हस्कर, माजी चेअरमन योगेश भिलारे यांनी केले आहे. 

      संबधीत व्यक्तिला जेवढे कर्ज दिले आहे तेवढी मालमत्ता बॅकेकडे तारण असून ती सिल करण्याचे अधिकार बँकेला मिळाले आहेत . शिवाय बॅक आब्रु नुकसानीचा दावाही दाखल करणार असल्याचे यावेळी सांग0यात आले.

Related Stories

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात पाच जण कोरोना बाधित

Archana Banage

चौदा वर्षांपासून फरार असलेला आरोपी गजाआड

datta jadhav

सातारा शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे होणार आता निरबीजिकरण

Archana Banage

खंबाटकी घाटात दोन कंटेनरला आग

Patil_p

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

datta jadhav

गोडोलीतल्या इमारतीस जिल्हा पत्रकार भवनाच्या नावाचा ठराव पालिका सभेत मंजूर

Patil_p