Tarun Bharat

दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रावर गुन्हा

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचाराचा निराधार आरोप करणारे केंदीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर कॉट्रोव्हर्सीला सुरुवात झाली. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती.
त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. सालियन कुटुंबीयांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती.

त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता. या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे किंवा ती गरोदर असल्याचे नमूद केलेले नाही. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देत महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात खोटे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

मानवी रक्षा व भाजीपाल्याच्या कचऱयापासून खत निर्मिती..!

Patil_p

आनंद तेलतुंबडेंना ‘सर्वोच्च’ दिलासा; न्यायालयाकडून जामीन कायम

Archana Banage

…अन् लॅपटॉप भेट देत छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले

Archana Banage

शेततळ्यात बुडून दोन मुलींसह महिलेचा मृत्यू

Patil_p

पंजाबमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित

Abhijeet Khandekar

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

Patil_p
error: Content is protected !!