Tarun Bharat

दि बेळगाव मर्चंट्स सोसायटीतर्फे मुदत ठेव योजनेचा शुभारंभ

बेळगाव / प्रतिनिधी

दि बेळगाव मर्चंट्स को-ऑप. पेडिट सोसायटीने कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत देखील 10.50 टक्के व्याजदराने मुदत ठेव योजना सुरू करून सर्वसामान्यांचे हित जपले आहे. सभासदांच्या अडचणी लक्षात घेऊन चांगल्या सुविधा पुरविण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद आहे. विश्वासाच्या जोरावर संस्थेने सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे, असे विचार कर्नाटक सरकारचे दिल्ली मुख्य प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केले.

दि बेळगाव मर्चंट्स सोसायटीच्या कार्यालयात शुक्रवारी नववर्षानिमित्त मुदत ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर मर्चंट्स सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले, मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, शाखा चेअरमन नारायण किटवाडकर आदी उपस्थित होते.

 नारायण किटवाडकर म्हणाले, येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुदत ठेव ठेवणाऱया ठेवीदारांना 10.50 टक्के व्याज देण्याचे ठरले असून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे सांगितले. नववर्षाचे औचित्य साधून या योजनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी बाळासाहेब काकतकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शंकरगौडा पाटील यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी चेअरमन नारायण चौगुले यांनी स्वागत केले.

याप्रसंगी संचालक अशोक बेळगुंदी, अशोक यळळूरकर, परशराम पाटील, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, रेखा अत्तीमरड, मिलिंद शिंदे, सुदर्शन जाधव, लक्ष्मीकांत मकवाण, संतोष फडतरे यांसह सभासद, कर्मचारी उपस्थित होते. परशराम पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

छत्रपतींमुळे जवानांच्या नसानसात शौर्य

Amit Kulkarni

राम मंदिराकरिता निधी संकलन अभियान 15 जानेवारीपासून

Patil_p

कृष्णा स्पिच थेरपीतर्फे उद्या कान-वाचा मोफत तपासणी शिबिर

Amit Kulkarni

‘त्या’ मृत वानरावर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार

Tousif Mujawar

पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटकरत्न पुरस्कार

Abhijeet Khandekar

महालक्ष्मी कोविड सेंटरला जोतिबा रेमाणी यांच्याकडून 50 पीपीई किट भेट

Patil_p