Tarun Bharat

दीड वर्षांनी मार्केटची 1200 कोटींची भरारी !

प्रतिनिधी / कोल्हापूर

इंधनाचे दिवसेदिवस वाढत असलेले दर, कोरोनाच्या लॉकडाऊननंतर देशात निर्माण झालेले मंदीसदृश्य वातावरण यामुळे अडचणीत असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांना शुक्रवारच्या दसऱयाने चांगलाच हात दिला. दीड पावणे दोन वर्षे ब्रेक लागलेल्या मार्केटने विजयादशमीदिनी मंदीचे दहन करताना खरेदीचे सिमोलंघन करत गगन भरारी घेतली. कोल्हापूरच्या बाजार पेठेत तब्बल 1200 कोटींची उलाढाल झाली. विशेष म्हणजे दुचाकी वाहनांच्या खरेदीबरोबर मोबाईल, स्मार्ट टिव्ही आणि सोने खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल राहिला. इलेट्रॉनिक्स वस्तुंच्या खरेदीच्या बरोबरीने इलेक्ट्रीक बाईक्स खरेदीलाही ग्राहकांचे प्राधन्य राहिले.

सोन्याबरोबर दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य 

सोन्याचा दर कितीही वाढला तरी दसऱयाच्या शुभमुहुर्तावर गुंजभर सोन्याची खरेदी बाजारात होत असते. गतवर्षी सराफ बाजार थंड असून देखील सोन्याच्या दर चढता होता. गेल्या दसऱयाला सोने 52,380 तर चांदी 62,500 असा होता. यंदा हाच दर अनुक्रमे 48,800 रूपये व 63,300 रूपये असा होता. सोनेदरातील घट आणि चांदीच्या दरातही अल्प वाढ यामुळे ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले. यामध्ये सोन्याच्या दागिने खरेदीकडे महिला वर्गाचा सर्वाधिक कल राहिल्याची माहिती सराफ व्यावसायिक रोहिते कारेकर यांनी दिली.

      मोबाईला शोरूम हाऊसफुल्ल

दसऱयाच्या शुभमुहुर्तावर शहरातील नामवंत मोबाईल शोरूम्समध्ये मोबाईल खरेदीसाठी गर्दी झाली होती. 15 ते 20 हजार रूपयाच्या नवीन मॉडेल्सच्या मोबाईलची सर्वाधिक विक्री झाली असल्याचे हिरापन्ना शोरूमचे प्रभू माखेजा यांनी सांगितले. त्याच बरोबर स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रो ओव्हन या इलेट्रॉनिक्स वस्तुंसह लॅपटॉप खरेदीलाही ग्राहकांनी पसंदी दिल्याचे राजाकाका इलेट्रॉनिक्सचे दीपक यांनी सांगितले.

 दुचाकी विक्रीत 30 टक्के वाढ 

दसऱयाच्या खरेदीसाठी नविन इलेक्ट्रॉनिक्स व बीएस सिक्स प्रणालीच्या चारचाकी वाहनांचे बुकींग मोठया प्रमाणात झाले होते. दसऱया दिवशी मुहुर्तावर डिलिव्हरी देण्यात आल्याचे साई सव्ह्&िसचे वाघमोडे यांनी सांगितले. तर गतवर्षीच्या तुलनेत दुचाकीच्या विक्रीत तब्बल 30 टक्के वाढ झाली. दुचाकीमध्ये टीव्हीएसच्या ब्रँडेड आयक्यू ज्युपिटर या दुचाकीची मोठी मागणी असल्याचे के.आर. टिव्हीएसचे मालक करण सोनवणे यांनी सांगितले.

 प्लॅट खरेदीसाठी विचारणा, बुकींग

दिवाळी पाडव्याला फ्लॅटची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यासाठी दसऱयाला काही ग्राहकांनी वन ते फोर बीएचके प्लॅटच्या खरेदीसाठी विचारणा केली तर काहींनी बुकींग केले. नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे फ्लॅटच्या दरात 15 टक्क्यांनी घसरण होणार असल्यानचे रामसिना कन्स्ट्रक्शनचे मालक सचिन ओसवाल यांनी सांगितले.

ई-बाईक्सना मागणी

वीजेवर चालणाऱया इलेक्ट्रीक्स बाईक्सना यंदा ग्राहकांनी सर्वाधिक पसंदी दिली. पेट्रोलचे वाढते दर यामुळे ई-बाईक्स खरेदीकडे ग्राहक वळल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाऊननंतर बाजारपेठेने भरारी घेतली. दसऱया मुहुर्तावर बाजारपेठेत 1200 कोटींची उलाढाल झाली. गतवर्षी अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिकांसाठी ही समाधानाची बाब आहे. -संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रिज

Related Stories

कोल्हापूर जिल्हा सक्रीय रूग्णसंख्येत वाढ, 14 नवे रूग्ण

Archana Banage

सांगलीतील वृद्ध महिलेची महिनाभराच्या ताटातूटीनंतरनंतर तिच्या कुटुंबीयांशी झाली भेट

Archana Banage

Kolhapur; गोकुळ’च्या आगामी निवडणुकीची ‘बेगमी’

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शिरोली दुमाला येथे गोठ्यास आग; सुदैवाने जीवित हानी टळली

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात ७ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

दिल्ली येथील आंदोलन समर्थनात शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने धरणे आंदोलन

Archana Banage