Tarun Bharat

दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

रुग्णालयांना दिले जम्बो आँक्सीजन सिलेंडर

वेंगुर्ले /वार्ताहर-

माजी पालकमंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील रुग्णालयांमध्ये जंबो ऑक्सिजन सिलेंडरचे शिवसेनेच्या वतीने लोकार्पण करण्यात आले. केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे ४० तर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयास २० ऑक्सिजन जंबो सिलेंडर चे लोकार्पण माजीआमदार शंकर कांबळी व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते डॉ अतुल मुळे यांच्या जवळ सुपुर्द करण्यात आले.


यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोनाच प्रादुर्भाव लक्षात घेता कोणाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आदरणीय आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर वाढदिवसाच्या औचित्य साधून रुग्णांना अंडी व फळे सुद्धा वाटप करत आहोत. याआधी दिपक केसरकर यांच्या माध्यमातून ग्रामविलगीकरण कक्षासाठी बेड वाटप केले होते.


यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, महिला तालुका संघटक सौ. सुकन्या नरसुले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, निलेश चमणकर, उपनगराध्यक्षा सौ अस्मिता राऊळ ,शहर समन्वयक विवेक आरोलकर, नितीन मांजरेकर, प्रकाश गडेकर, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख दादा सारंग, मितेश परब, वेदांग पेडणेकर, राहुल नरसाळे, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित पडवळ, शैलेश परुळेकर, महीला म्हापण शाखा संघटक सौ. प्रियदर्शनी फाटक, उभादांडा विभाग संघटिका सायली आडारकर, शाखा संघटिका अपेक्षा बागायतकर, शितल साळगावकर, हर्षा परब, लतिका रेडकर, मयुरी राऊळ, नंदिनी धानजी, उमा मठकर, स्वरूपा गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

गोडय़ा पाण्यातील मत्स्य पालनाला 100 टक्के प्रतिसाद

NIKHIL_N

सादिल अनुदानाचे 28 कोटी गेले कुठे?

NIKHIL_N

चार महिने खेटे घालुन ही ग्रास्थांची शासन दरबारी चेष्टा थांबेना

Archana Banage

जि. प. अध्यक्षपदी भाजपच्या संजना सावंत

NIKHIL_N

जातिवाचक शब्द कामकाजातून काढा!

NIKHIL_N

जिल्ह्यात उदयापासून शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला

NIKHIL_N