मुंबई / ऑनलाईन टीम
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आरोपीवर कडक कारावाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. याप्रकरणी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यानंतर आता मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.
दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर डीएफओ विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे निलंबनही करण्यात आले. मात्र याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दीपाली यांच्या आईने देखील याप्रकरणी आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.


previous post