Tarun Bharat

दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नेमावा : बाबा रामदेव

 ऑनलाईन टीम / इंदूर :

अभिनेत्री दीपिका पदुकोणने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबी समजून घेण्यासाठी माझ्यासारखा सल्लागार नेमावा, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दीपिकाला दिला आहे.

जेएनयू हिंसाचार प्रकरणानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनस्थळी त्यांची भेट घेऊन त्यांचे समर्थन केल्याप्रकरणी दीपिकावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. त्यानंतरच्या वादात आता योगगुरू रामदेव बाबांनी उडी घेतली आहे.

जेएनयू प्रकरणावर बोलताना रामदेव बाबा म्हणाले, दीपिका अभिनय क्षेत्रात सर्वोत्तम आहे. मात्र, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबी तिने समजून घ्यायला हव्या. या सर्व बाबी समजून घेण्यासाठी तिला पुन्हा एकदा देश समजून घ्यावा लागेल. त्यासाठी तिने माझ्यासारखा सल्लागार नेमावा. तसेच नागरिकत्व कायदा हा लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. त्यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 28 वर

datta jadhav

एक दिवस ओवेसीदेखील हनुमान चालीसा वाचतील : योगी आदित्यनाथ

prashant_c

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केलेल्या हत्येविरुद्ध एकजुटीसाठी मी उत्तर प्रदेशला जाणार – ओवेसी

Archana Banage

सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण… : राज ठाकरे

Tousif Mujawar

आज राज्यात १८७ नवीन रुग्णा; एकूण रुग्णसंख्या १७६१

Archana Banage

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!