Tarun Bharat

दीप सिद्धूच्या मृत्यूमागे अपघात की घातपात ?

Advertisements

कारने ट्रॉलीला धडक दिल्यानंतर निधन, प्रियसी रिना रॉय जखमी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाबी सिने-अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला आहे. तथापि, दीप सिद्धूला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्मया येत होत्या. याबाबत त्याने तक्रारही केली होती. त्यामुळेच हा अपघात की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, सिद्धूच्या कारने एका ट्रॉलीला मागून धडक दिल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक ध्वज फडकावल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. मंगळवारी रात्री कुंडली-मानेसर-पालवाल द्रुतगती मार्गावर त्याच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला खारखोडा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, त्याच्यासोबत वाहनामध्ये असलेली त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिना रॉय बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्यावषी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. दीप सिद्धूने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केले होते.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Patil_p

सॅमसंग करणार हजार जणांची भरती

Patil_p

कोरोना : आता संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन : नरेंद्र मोदी

tarunbharat

मिझोरम सीमेवर आसामने वाढविला बंदोबस्त

Patil_p

रुग्णालयाचा निष्काळजीपणा, फुटबॉलपटूचा मृत्यू

Amit Kulkarni

कोव्हॅक्सिनसंबंधी आणखी माहिती मागविली

Patil_p
error: Content is protected !!