Tarun Bharat

दुकानाच्या बाहेरून खरेदी करा

सर्व दुकानदारांनी ग्राहकांचा केला प्रवेश बंद

प्रतिनिधी/ सातारा

सोशल डिस्टन्स् नियमांचे पालन करत विक्रेत्यांना दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गृहउपयोगी वस्तूसह, कापड खरेदीला ग्राहक गर्दी करत आहेत. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी विक्रेत्यांनी दुकानात प्रवेश बंद केला तरी दुकानाबाहेर वाढत्या गर्दीकडे दुर्लक्ष होत आहे.

        लॉकडाऊनचे नियम शिथील करत जीवनावश्यक वस्तूसह कापड विक्रेते, गृहउपयोगी वस्तू खरेदीला परवानगी मिळाली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागातील दुकानात खरेदीचा जोर चांगलाच वाढला आहे. दरम्यान, कोरोनाचा धास्ती अद्याप कायम आहे. जिह्यात बाधिताचा आकडा वाढत आहे. तरीही लोक घराबाहेर पडत आहेत. विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी दुकानात ग्राहकांचा प्रवेश बंद केला आहे. दुकानाच्या बाहेर दोरी बांधण्यात आली आहे. काहींनी दुकानात प्रवेश करू नका असे सुचना फलक लावले आहे. यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्या एक मीटरचे अंतर निर्माण झाले आहे. हे अंतर दुकानाबाहेर दिसत नाही. प्रवेशावर बंदी घातल्याने दुकानाच्या बाहेर गर्दी होत आहे. ग्राहक सोशल डिस्टन्स न पाळता  उभे राहतात. यांच्याकडे विक्रेते दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. दुकानदारांनी यांना सुचना करणे गरजेचे असताना यांच्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.

Related Stories

रिपाइं स्वबळावर निवडणुका लढणार

datta jadhav

मिरजेत एमआयएमतर्फे काँग्रेस मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Abhijeet Khandekar

करवीरचा क्रुपेश पाटील महाराष्ट्र हॉलीबॉल संघाचा कर्णधार

datta jadhav

महामार्गावरील चर्चा बेतली जीवावर!

Patil_p

उद्यापासून जिल्हा बँकेच्या ठरावांना सुरुवात

Patil_p

कोरोनावर आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar