Tarun Bharat

दुखापतग्रस्त नेमार विश्वचषक पात्रता फेरीतून बाहेर

साओ पॉलो / वृत्तसंस्था

पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघाचा सुपरस्टार व ब्राझिलियन फुटबॉल संघाचा भक्कम आधारस्तंभ नेमार दुखापतीमुळे 2022 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

28 वर्षीय नेमार पात्रता फेरीतील डबलहेडर खेळावा, यासाठी व्यवस्थापनाचे प्रयत्न होते व यासाठी त्यांनी नेमारला संघात दाखल होण्याची सूचना केली होती. मॉन्टेव्हिडिओ येथील उरुग्वेविरुद्ध लढतीपूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त असावा, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नांना यश लाभले नाही.

नेमारमध्ये प्रगती आहे. पण, तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही, असे ब्राझिलियन राष्ट्रीय संघाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. रॉड्रिगो लास्मर यांनी येथे नमूद केले. ‘उरुग्वेविरुद्ध लढत मंगळवारी होत आहे आणि त्यापूर्वी तो तंदुरुस्त असावा, असे प्रयत्न होते. पण, ते होऊ शकले नाही. त्यामुळे, सहायक पथकाने नेमारला संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला’, असे ते पुढे म्हणाले.

नेमारला ब्राझील संघातून मुक्त करण्याच्या निर्णयाचे विशेषतः पीएसजी व्यवस्थापनाकडून स्वागत केले जाईल, असे संकेत आहेत. पीएसजी बॉस थॉमस यांनी त्यावेळी नेमारला पात्रता फेरीत खेळवण्याच्या ब्राझील संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

ब्राझिलियन संघातून फिलीप कॉटिन्हो, फॅबिन्हो व रॉड्रिगो कैओ दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले आहेत तर ईडर मिलिताओ, गॅब्रिएल मेनिनो कोरोनाबाधित असल्याने खेळू शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर, नेमारची गैरहजेरी ब्राझिलियन संघाला आणखी प्रकर्षाने जाणवू शकते.

तूर्तास, ब्राझिलियन प्रशिक्षक टिटे यांनी आक्रमणाला धार आणण्यासाठी फ्लेमेंगो स्ट्रायकर पेड्रोचा समावेश केला आहे. मात्र, रिचर्लिसन व रॉबर्टो फर्मिन्हो या अनुक्रमे इव्हर्टन व लिव्हरपूलच्या खेळाडूंकडून त्यांना अधिक अपेक्षा असणार आहेत.

Related Stories

मुष्टीयुद्ध संघटनेची निवडणूक लांबणीवर

Patil_p

इंग्लंड संघाची विजयाकडे वाटचाल

Patil_p

विद्यमान विजेत्या विंडीजचे आव्हान संपुष्टात

Amit Kulkarni

एटीपी चषक स्पर्धेत सर्बियाला कठीण ड्रॉ

Patil_p

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

datta jadhav

स्पेनचा अँडय़ूजेर उपांत्य फेरीत

Patil_p