Tarun Bharat

दुचाकीमध्ये हिरो स्प्लेंडरलाच पसंती

होंडा ऍक्टिव्हा, पल्सर, प्लॅटिना यांना टाकले मागे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही वर्षांपासून वाहन क्षेत्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या अनेक दुचाकींमध्ये हिरोची स्प्लेंडर आजही अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. भारतामधील हिरो मोटोकॉर्पची बजेटमधील दुचाकी म्हणून हिरो स्प्लेंडरने लौकीक प्राप्त केला आहे. अन्य महिन्यांच्या बरोबरीत नोव्हेंबर महिन्यातही हिरो स्प्लेंडरची विक्री मजबूत झाली आहे.

साधारणपणे महिना आणि वार्षिक विक्रीमध्ये मोटरसायकल आणि स्कूटरप्रमाणे हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पहावयास मिळाले असून होंडा ऍक्टीव्हासारख्या स्कूटरसोबत होंडा सीबी शाइन, हिरो एचएफ डिलक्स, बजाज पल्सर, बजाज प्लॅटीना, टीव्हीएस ज्युपिटरसह अन्य दुचाकी व स्कूटर यांना पाठीमागे टाकले आहे.

स्प्लेंडर अव्वलस्थानी कायम

हिरो स्प्लेंडरची ओळख सर्वसमान्यांची दुचाकी म्हणून राहिली आहे. जादा मायलेजसह सर्वसामान्यांच्या बजेटमधील दुचाकी अशीही ग्राहकांची धारणा आहे. यामध्ये नोव्हेंबर 2021 मधील बेस्ट सेलिंग दुचाकी पहिल्या 10मध्ये मागील महिन्यात अव्वल राहिली असून एकूण 1,92,490 इतकी विक्री झाली आहे.

बजाज प्लॅटिनाची विक्री महिन्याच्या आधारे तेजीत

भारतामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात विक्री झालेल्या दुचाकींमध्ये पाचव्या स्थानी बजाज पल्सर असून स्वस्त दुचाकी विक्रीत बजाज प्लॅटिनाचा एकूण आकडा 60,646 वर राहिला आहे. यासह सातव्या स्थानी टीव्हीएस मोटरची स्कूटर टीव्हीएस ज्युपिटर राहिली आहे.

Related Stories

बीएमडब्ल्यूच्या यंदा 25 नव्या मोटारी

Patil_p

टाटा मोटर्सकडून 40 लाख कार्सचे उत्पादन

Patil_p

नवी अप्रिलिया स्कूटर दक्षिण भारतात होणार उपलब्ध

Patil_p

गुजरातेत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ

Patil_p

‘ऑडी ए8एल’चे बुकिंग सुरु

Amit Kulkarni

हिरो मोटोकॉर्पने विकल्या 1 लाख दुचाकी

Amit Kulkarni