Tarun Bharat

दुचाकीवरून हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱयाला अटक

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

दुचाकीवरून हातभट्टीची अवैध दारू वाहतूक करणाऱयाला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आल़ी  शहरालगतच्या मजगाव रोड विमानतळासमोर ही कारवाई करण्यात आल़ी जगदीश जयवंत नाखरेकर (40, ऱा मिरजोळे नाखरेकरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आह़े

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती विभागाला प्राप्त झाली होत़ी त्यानुसार मंगळवारी सकाळी उत्पादन शुल्क विभागाकडून मजगाव रस्त्यावरील विमानतळ येथे सापळा लावण्यात आला होत़ा  दरम्यान संशयित आरोपी नाखरेकर हा दुचाकीवरून (एमएच 08 एस 229) संशयितरित्या जात असल्याचे दिसल़े त्याची दुचाकी थांबवून झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे गावठी हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाखरेकर याच्याकडील दुचाकीसह 18 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल़ा तर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आह़े

Related Stories

देवगड शिक्षण विभागात करोडोची अफरातफर

NIKHIL_N

लुटीतील रोकड हस्तगत करण्यासाठी पोलिसांची फिल्डींग

Patil_p

जिल्हय़ातील मच्छी व्यवसाय ठप्प

tarunbharat

चिपळूणच्या ऋतुराजची ‘अंतराळ’ भरारी!

Patil_p

जिह्यात गांजाविरोधात ‘कोंबिंग ऑपरेशन’

Patil_p

हापूसच्या मदतीला धावली पोस्टाची ‘मेलमोटार’

NIKHIL_N
error: Content is protected !!