Tarun Bharat

दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी/हातकणंगले

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता हातकणंगलेच्या सीमा सील करण्यासाठी लावलेल्या बॅरिकेटसचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भगवान रंगराव पाटोळे (वय ६०, रा. गायरान वसाहत, घुणकी, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. हा अपघात काल, सोमवारी रात्री हातकणंगले येथील भंडारे पेट्रोल पंपासमोर झाला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.

इचलकरंजीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने हातकणंगले नगरपंचायतीने गावच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हातकणंगले, इचलकरंजी मार्गावर भंडारे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर बॅरिकेटस लावून रस्ता बंद करण्यात आला. मात्र या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. इंडिकेटर, रिप्लेक्टर लावले नव्हते. दरम्यान घुणकी येथील भगवान पाटोळे हे नातेवाईकांना सोडण्यांसाठी मोटरसायकल क्र.(MH 09 ES 6225) वरून इचलकरंजीला गेले होते. परत येत असताना हातकणंगले येथील बॅरिकेटसचा त्यांना अंदाज आला नाही. भरधाव वेगाने ते त्यावर जाऊन आदळले. यात रस्त्यावर जोरात पडल्याने त्यांच्या मेंदूला जबर मार बसून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यांना उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण अतिरक्तस्त्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Related Stories

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

Archana Banage

गांजा नशाबाजाकडून कबनुरात दोघांवर सशस्त्र हल्ला

Archana Banage

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Archana Banage

कसबा सांगाव येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Archana Banage

उदयनराजेंनी शरद पवारांची घेतली भेट

Archana Banage

मुख्यमंत्र्यांची चार वाजता बैठक ; मुंबईतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा

Archana Banage
error: Content is protected !!