Tarun Bharat

दुचाकी अडविल्याच्या रागातून पोलिसांवर हल्ला

दरबार गल्लीतील घटनेने खळबळ

प्रतिनिधी/ बेळगाव

 कोरोना काळात रात्रीच्यावेळी पोलिस बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी तसेच विचारणा करत आहेत. दरबार गल्ली येथे सोमवारी रात्री अशाचप्रकारे दुचाकीस्वाराला अडवून त्याची चौकशी करताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत.

 अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया दरबार गल्ली येथून तिघेजण मोटरसायकलवरून जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले. मात्र अडविले का म्हणून त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी आणखी काही मित्रांना बोलावून घेऊन हा हल्ला केला. यात पोलिस जखमी झाला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

गोवा बनावटीचा 26 लाखांचा दारूसाठा जप्त

Amit Kulkarni

शिवाजी उद्यानाशेजारील ग्रंथालयाची इमारत भुईसपाट

tarunbharat

भाग्यनगर येथे साकारला सुवर्णदुर्ग

Patil_p

सिलिंडरचे दर कमी करण्यासह कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सायकली नित्कृष्टच

Patil_p

केएलईमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन

Amit Kulkarni