Tarun Bharat

दुचाकी अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील जयगड ते खंडाळा बायपास रोडवर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल़ा  मंगळवारी सकाळी 8 वाजता घडलेल्या या अपघातात नयन संतोष साळवी (29, पाली, सध्या सडय़ेवाडी- रत्नागिरी) याचा मृत्यू झाला आहे.

   या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नयन साळवी ज्युपिटर दुचाकी (एमएच 08, एव्ही 5661) घेऊन जयगड ते खंडाळा असा जात होत़ा  त्यावेळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याकडेच्या सिमेंट कठडय़ावर जोरदार आपटल़ा  यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल़ा या बाबतची फिर्याद योगेश बाळू गोताड (28, आगरनरळ, कुणबीवाडी) यांनी जयगड स्थानकात दिल़ी  या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

ट्रक-कार अपघातात मायलेकासह तीन ठार

Patil_p

श्री देव कुणकेश्वर यात्रा यावर्षी ग्रामस्तरावरच

NIKHIL_N

रत्नागिरी विभागात एसटीचे 537 कर्मचारी हजर

Patil_p

विहिंपतर्फे पूरग्रस्तांसह गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Anuja Kudatarkar

मळगाव-इसवटी प्रसाद मित्रमंडळाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत

NIKHIL_N

जिल्हय़ात 76 शाळा पटसंख्येअभावी बंद

NIKHIL_N
error: Content is protected !!