Tarun Bharat

दुचाकी अपघातात पर्रात वयोवृद्ध ठार

प्रतिनिधी /म्हापसा

पर्रा कळंगूट दरम्यान हमरस्त्यावर बुलेट व मोटारसायकल दरम्यान झालेल्या समोरासमोरील टक्करीत पिकेन मरड येथील (मुळ गुजरात) नागरिक प्रकाश मेहता (वय 68) याच्या डोक्याला जबर मार लागल्याने अखेर तो गोमॅकोत उपचार घेत असताना मरण पावला.

याबाबत साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रा हमरस्त्यावर दि. 3 ऑक्टोबर रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या दरम्यान हिमालय बुलेट जीए-03 एक्यू-6813 ने संयोग सतीश नाईक वय 19 रा. कोटला साळगाव हा येत असता विरुद्ध दिशेने एक्सकोर्ट दुचाकीने प्रकाश मेहता वय 68 येत असता दोघामध्ये समोरासमोर टक्कर झाली. त्यात प्रकाशच्या डोक्याला जबर जखम झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला गोमॅकोत दाखल करण्यात आले. उपचार घेत असतानाच मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. हवालदार उल्हास खोत यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.

Related Stories

अमर नाईक खून प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराचा छडा लावण्यास पोलिसांना यश

Amit Kulkarni

कारवारला कोकणी – कन्नड वाद उफाळला

Amit Kulkarni

सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घ्या

Amit Kulkarni

ओकांब धारबांदोडा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Patil_p

पिसुर्ले गावात पाण्याची टंचाई गंभिर

Amit Kulkarni

कुंकळ्ळी येथे 24 पासून कालीमाता पूजनोत्सव

Omkar B