Tarun Bharat

दुचाकी अपघातात बालिका ठार

मसूर/ प्रतिनिधी

: शामगाव – मसूर रस्त्यावर मसूर पोलीस दूरक्षेत्रा जवळ उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक  करताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील वरील ऊस तोडणी मजुराची सहा वर्षाची बालिका खाली पडल्याने ट्रक्टरचे पाठीमागील चाक पोटावरुन गेल्याने मयत झाल्याची घटना बुधवार दि.2  रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतुजा महादेव सरवदे वय 6 मूळ रा. वारोळा ता. माजलगाव जि. बिड सध्या रा. मसूर ता कराड असे अपघातात मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऊस तोडणी मजूर महादेव विठ्ठल सरवदे हे आपल्या पत्नीसह मुलीला घेऊन ऍक्टिवा मोटर सायकल नंबर एम.एच.11 एटी6762 वरून चिखली येथे ऊस तोडणी करण्यासाठी गेले होते दिवसभर ऊस तोडणी केल्यानंतर मधल्या रस्त्याने शामगाव ते मसूर जाणारे रोडने मसूर कडे परतत असताना समोरून एक उसाने भरलेल्या ट्रक्टर चालला होता सदर ट्रक्टरला दुचाकीस्वार पाठीमागून ओव्हरटेक करीत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील तोडणी मजूर व त्याची पत्नी रस्त्याचे उजवे बाजूस पडले तर मुलगी ट्रक्टरच्या पाठीमागील जवळ पडलेली असताना तिच्या पोटावरून ट्रक्टरचे चाक गेल्याने ती  मयत झाली. सदर घटनेची खबर मयत बालिकेचे वडील महादेव विठ्ठल सरवदे यांनी मसूर दूर क्षेत्रात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार तावरे करीत आहेत.

Related Stories

महाराष्ट्राने वेगळा कृषी कायदा करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – राजू शेट्टी

Archana Banage

गडहिंग्लजमध्ये जुम्मा मशिदीत जमलेल्यांवर पोलिस कारवाई

Archana Banage

दसरा मेळाव्याबाबत राज ठाकरेंनी दिला होता योग्य सल्ला, पण मुख्यमंत्र्यांनी केलं दुर्लक्ष

datta jadhav

कोल्हापूर : हाजी अस्लम सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Archana Banage

कुलभूषण प्रकरणी भारताला वकील नेमण्याची संधी

Patil_p