Tarun Bharat

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

कॉलेज रोडवर मोटारसायकल घसरून पडल्याने दुर्घटना : विजापूरचे दोघे गंभीर जखमी

प्रतिनिधी /बेळगाव

मोटारसायकल घसरून पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना कॉलेज रोडवरील पवन हॉटेलजवळ घडली. सोमवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वीरेश कोरती (वय 22, रा. बैलहेंगल) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.

या अपघातात शिवानंद ईश्वर तेरदाळ (वय 21) आणि प्रज्वल कोरी (वय 25, दोघेही रा. विजापूर) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अंगडी महाविद्यालयामध्ये ते शिक्षण घेत आहेत. जेवणासाठी बेळगावात आले होते. जेवण करून रात्री कॉलेजकडे परतताना ही घटना घडली. मयत वीरेश कोरती हा पल्सर मोटारसायकल चालवत होता. शिवानंद आणि प्रज्वल मागे बसले होते.

डोक्याला गंभीर दुखापत

कॉलेज रोडवरील पवन हॉटेलजवळ अचानक पल्सर घसरली. त्यानंतर हे तिघेही खाली कोसळले. दुचाकीचा वेग अधिक असल्याने वीरेशच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. मागे बसलेले शिवानंद आणि प्रज्वल हेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताचा आवाज ऐकून काही वॉचमन तेथे जमा झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर या सर्वांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले. मात्र, वीरेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

सेंद्रिय शेती पद्धत ही काळाची गरज

Omkar B

कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा दिवस नीरव शांततेत

Patil_p

सेवाभावी डॉक्टर-सीएंचा यथोचित गौरव

Omkar B

कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Omkar B

साईराज चषक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

संगमेश बिराजदारकडून प्रदीप ठाकुर चीत

Amit Kulkarni