Tarun Bharat

दुचाकी चोर 24 तासात गजाआड

Advertisements

वार्ताहर / पुसेगाव :

पुसेगाव येथील छ. शिवाजी चौकातून सोमवारी रात्री दुचाकी चोरून नेणाऱ्या आरोपीला 24 तासांच्या आत पुसेगाव पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. हणमंत भगवान पाटोळे (रा. दिवडी ता. माण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदारसिंह दिलीप तारळकर यांच्या राहत्या घरासमोरून रात्रीच्या वेळी होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक एम एच 11 बी एस 3521) चोरीला गेली. सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिवडी ता. माण येथील हणमंत भगवान पाटोळे याला अटक करून त्याच्याकडील 65000 रुपये किंमतीची चोरलेली दुचाकी ताब्यात घेतली.

Related Stories

दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील

Patil_p

कोरोनाला पुन्हा गती, नवे 80 रूग्ण

Patil_p

काशीळ येथील कोविड सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान

datta jadhav

सरपंचानी पुन्हा एकदा प्रभावीपणे काम करण्याची वेळ आली आहे : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Archana Banage

शहर अन् हद्दवाढीतील विकासकामांसाठी 1 कोटी

Patil_p

पालिकेच्या धुर फवारणी मशिन धुळ खात

Patil_p
error: Content is protected !!