Tarun Bharat

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

प्रतिनिधी / मडगाव

मायणा -कुडतरी पोलिसांनी केलेल्या एका धाडसी कारवाईत एका आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरण्यात आलेल्या अंदाजे 6.5 लाखांच्या 8 दुचाक्या जप्त केल्या. हा दुचाकी चोरटा गोव्यातील अनेक पोलीस स्थानकात हवा असल्याची माहिती पोलिसानी दिली.

अटक करण्यात आलेल्या या चोरटय़ाचे नाव शाहबुद्दीन धवलसाब शेख (21) असे असून तो पत्रावाडा-काकुमड्डी, कुडचडे येथे राहात असल्याची माहिती मायणा -कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिली.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी -मायणा कुडतरी पोलीस स्थानकात एक तक्रार आली. स्वप्न नगरी- फातोर्डा येथील दीपक पांडे (52) यांच्या मालकीची 75 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी चोरण्यात आली अशा आशयाची ती तक्रार होती.

या तक्रारीवर आधारुन पोलिसांनी पोलीस निरीक्षक श्री. वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. ही चोरी एका संशयितानेच केलेली असावी असा धागा पोलिसांना मिळाला होता. त्या धाग्यावरुन पोलिसांनी  शाहबुद्दीन धवलसाब शेख या संशयिताच्या घरावर धाड घातली तेव्हा त्याच्या घराजवळ पोलिसाना एकूण 8 दुचाक्या सापडल्या व त्या सर्व दुचाक्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत अंदाजे 6,50,000 रुपये इतकी असेल.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभीत सक्सेना, मडगाव पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष मडकईकर व पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत, पोलीस शिपाई धिरज नाईक, विकास नाईक, चेतन कोली, रिझवान शेख, रोनित नाईक, दिवेश गावडे यांनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या शाहबुद्दीन धवलसाब शेख हा अनेक पोलीस स्थानकात हवा असल्याची माहिती पोलिसानी दिली.

Related Stories

फोंडा गट काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर जयंती

Omkar B

हरवळे धबधब्यावर आंघोळीला जाऊ नका!

Amit Kulkarni

मडगाव रवींद्र भवनमध्ये आज ‘उटा’च्या नवीन समितीची स्थापना

Amit Kulkarni

कळंगुटकवासीयांना शहरीकरण नको असल्यास अध्यादेश रोखणार : मंत्री लोबो

Amit Kulkarni

सरकारने आयआयटी संदर्भात फेरविचार न केल्यास आंदोलन

Patil_p

‘पर्यावरणीय लेखा व नैतिकता’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Amit Kulkarni