Tarun Bharat

दुतर्फा हल्ल्याच्या शक्यतेने सज्जतेची गरज

Advertisements

हवाईदल प्रमुखांकडून इशारा ः चीन-पाकिस्तानकडून धोका असल्याचा दावा

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱया बाजूने चीन अशी भारताची भौगोलिक स्थिती असल्याने हे दोन्ही शत्रूदेश भारतासाठी धोकादायक आहेत. चीन आणि पाकिस्तानकडून एकाच वेळी हल्ला होण्याची शक्मयता वर्तवत भारताने नेहमीच सतर्क राहायला हवे, असे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी म्हटले आहे. भारताने पश्चिम आणि उत्तर सीमेवरील अशांतता आणि अस्थिरतेकडे ‘दुतर्फा आकस्मिक परिस्थिती’ म्हणून पाहावे. तसेच नेहमी हल्ला परतवण्याच्या पूर्वतयारीत रहावे, असेही त्यांनी सांगितले.

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी रविवारी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत भारतावर सर्व बाजूंनी हल्ला केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. लष्करी अडथळय़ांपासून ते बुद्धिमत्तेचा गैरवापर आणि उर्जा स्त्राsतांच्या हॅकिंगपर्यंत काहीही होऊ शकते. अशा परिस्थितीत भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या आव्हानांसाठी तयार राहायहला हवे, असे ते म्हणाले. यापूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनीही उत्तर आणि पश्चिम सीमेवर चीन आणि पाकिस्तानकडून एकाचवेळी होणाऱया हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

प्रत्येक धोक्मयाची जाणीव

भारत-चीन संबंधांवर सर्व जागतिक आणि भू-राजकीय घटनांच्या प्रभावाचे विविध पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने मूल्यांकन केले जात आहे. एक देश म्हणून आपल्याला आपल्या सर्व तात्कालिक आणि भविष्यातील धोक्मयांचे अचूक आकलन करणे आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांशी आणि धोक्यांशी लढण्यासाठी आवश्यक क्षमता तयार करता आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दल प्रत्युत्तर देण्यास सज्ज

भारत-चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमा विवादाबाबतही चौधरी यांनी भाष्य केले. उत्तर लडाखमधील सीमेजवळ चीनने आपली लढाऊ विमाने तैनात केल्याबद्दल विचारले असता भारताचे या स्थितीवर पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. घुसखोरीचा प्रसंग उद्भवल्यास हवाई दल केव्हाही चीनला प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे एअर चीफ मार्शल म्हणाले. तसेच संरक्षण दलांची ताकद वाढवणे आणि कोणत्याही बाजूने येणाऱया मोठय़ा धोक्मयाला सामोरे जाण्यासाठी तयार असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

युद्धाच्या तयारीत असणे शहाणपणाचे

भू-राजकीय बदलांचा संदर्भ देत भविष्यातील कोणत्याही संघर्षासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व घटकांना एकत्र करणे आवश्यक आहे. आपल्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर अनेक आव्हाने आहेत. विशेषतः येथील सीमांवर आधीच अशांतता आहे.  त्यामुळे कोणत्याही धोक्याकडे दुर्लक्ष न करता ‘दुहेरी युद्ध परिस्थिती’ म्हणून पाहणे आणि त्यानुसार तयारी करणे आपल्यासाठी शहाणपणाचे ठरेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Related Stories

कोरोना रोखण्याच्या राज्यांच्या उपायावर जीओएम समाधानी

Patil_p

महात्मा गांधींनाही हवा होता नागरिकत्व कायदा

Patil_p

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षात दाखल

Amit Kulkarni

देशात 37,975 नवे कोरोना रुग्ण, 480 मृत्यू

datta jadhav

देशात जुलै महिन्यात 11.1 लाख कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!