Tarun Bharat

दुबईत भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन

Advertisements

आज दसऱयाच्या शुभमुहूर्तावर भाविकांना प्रवेश 

नव्या भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मंदिराचे वास्तूशास्त्र अनोखे असून या मंदिरात हिंदूंच्या मुख्य 16 देवतांना स्थानापन्न करण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला दुबईचे सहिष्णुता आणि सहजीवन मंत्री आणि शेख नहयान बिन मुबारक अल नहयान, तसेच भारताचे राजदूत संजय सुधीर आणि संयुक्त अरब अमिरातीतील इतर मान्यवर उपस्थित होते.

या मंदिराचे उद्घाटन दसऱयाच्या आदल्या दिवशी, अर्थात नवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले असून तेथे भक्त आणि भाविकांना प्रवेश दसऱयाच्या दिवसापासून दिला जाणार आहे. या मंदिराची निर्मिती 3 वर्षांमध्ये करण्यात आली असून त्याला दुबईच्या स्थानिक प्रशासनाने त्वरित अनुमती दिली होती. कोरोनाचा उद्रेक जोरावर असतानाही ही अनुमती देण्यात आली होती. या मंदिराला 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने भूमी दिली होती. ही भूमी साधारणतः दोन एकर किंवा 80 हजार चौरस फूट इतकी आहे. हे मंदीर दुबईच्या जेबेल अली भागात असून हा भाग पूजा ग्राम म्हणून ओळखला जातो, अशी माहिती देण्यात आली.

16 देवतांच्या मूर्ती

या मंदिरात शिव, कृष्ण, गणेश, महालक्ष्मी इत्यादी 16 हिंदू देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गुरु ग्रंथ साहेबचीही स्थापना करण्यात आली आहे. हे मंदीर सर्व धर्मांच्या भाविकांसाठी आहे, असे मंदीर प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या मंदिराच्या वरच्या मजल्यावर प्रार्थना गृह असून तेथे 105 घंटा बसविण्यात आल्या आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

कोरोनामुळे दुसऱयांदा मातृत्व नाकारत आहेत न्यूयॉर्कमधील माता

Patil_p

पोलंड अध्यक्ष अमेरिकेत

Patil_p

4 हजार वर्षांपासून पेटतेय आग

Patil_p

महामारीत ‘पॅरेंटिंग’ मोठे आव्हान

Amit Kulkarni

चीनमधील भारतीयाला घातक विषाणूचा संसर्ग

Patil_p

फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन; वाहनांच्या 700 किमीपर्यंत रांगा

datta jadhav
error: Content is protected !!