Tarun Bharat

दुबई व लंडनहून 337 प्रवासी गोव्यात दाखल

प्रतिनिधी / वास्को

मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे दुबई व लंडनहून 337 हवाई प्रवाशांचे गोव्यात आगमन झाले. हे सर्व प्रवासी भारतीय असून ते लॉकडाऊनमुळे विदेशात अडकले होते. या सर्व हवाई प्रवाशांना बसमधून दक्षिण व उत्तर गोव्यातील हॉटेल्समध्ये क्वॉरंटाईनसाठी पाठविण्यात आले.

दुबईहून 167 प्रवासी घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. इंडिगो एअरलाईन्सच्या 6ई 6998 या विमानातून हे प्रवासी उतरले. या प्रवाशांची स्वॅब चाचणी घेतल्यानंतर त्यांना खासगी बसमधून उत्तर व दक्षिण गोव्यातील हॉटेलमध्ये क्वॉरंटाईनसाठी पाठविण्यात आले.

बुधवारी पहाटे आठच्या सुमारास लंडनहून एअर इंडियाचे विमान दाबोळी विमानळावर दाखल झाले. एआयओ 162 या विमानातून 170 प्रवासी उतरले. या प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. या प्रवाशांना कदंब बसमधून उत्तर व दक्षिण गोव्यातील हॉटेलमध्ये क्वॉरंटाईनसाठी पाठविण्यात आले.

Related Stories

कुशावतीला पुन्हा पूर, पूल-रस्ता पाण्याखाली

Amit Kulkarni

कोरगावात 50 लाखांचे ड्रग्स जप्त

Patil_p

श्रीरामराज्यासाठी ‘भारत’ नावाचा जयजयकार करा

Patil_p

आयपीएल ‘बेटिंग’ प्रकरणी चौघांना अटक

Patil_p

भाजपने पाठीत खंजीर खुपसल्यास पत्ते खोलणार

Amit Kulkarni

घराघरातच आज घुमणार लईराईचा जयघोष

Omkar B