Tarun Bharat

दुर्गामाता दौड भक्तिभावाने करणार

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत निर्णय

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव शाखेच्यावतीने यंदादेखील श्री दुर्गामाता दौड नऊ दिवस मोठय़ा भक्तीभावाने करण्याचा निर्णय रविवारी अनसुरकर गल्ली येथील छत्रे वाडा येथे झालेल्या बैठकीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱयांनी घेतला.

यावेळी नववीच्या समाजविज्ञान विषयाच्या कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या पाठय़पुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट केला आहे. तो चुकीचा असून तातडीने शासनाने ती पाठय़ पुस्तके रद्द करावीत, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

जिल्हय़ातील गावोगावी नवरात्रीत दुर्गादेवीचा गरज करत धारकरी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होतील. देव देश व धर्माच्या रक्षणासाठी संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण भागातील गावोगावी भव्य दुर्गामाता दौड काढण्याचा निर्णय देखील बैठकीत धारकऱयांनी घेतला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण गावडे, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहर प्रमुख अजित जाधव, विभागप्रमुख किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, अंकुश केसरकर, अनंत चौगुले, नामदेव पिसे, विठ्ठल सोमपण्णवर, विनायक कोकितकर, तालुक्यातील विभागप्रमुख हिरामणी मुचंडीकर, कपिल पाटील, प्रमोद मुतगेकर, परशराम पाटील, नाथा अमरोळकर, मिथील जाधव, केशव सांबरेकर, संदीप पाटील, किशोर लाड यासह धारकरी उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ातील 147 अहवाल निगेटिव्ह

Patil_p

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

Omkar B

धनादेशऐवजी आता मनपाच देणार लॅपटॉप

Patil_p

दहावीचा आज विज्ञान पेपर

Patil_p

जिल्हय़ात शुक्रवारी 23 नवे रुग्ण

Amit Kulkarni

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अक्षता कामतीला सुवर्ण

Amit Kulkarni