Tarun Bharat

दुर्गा दौडने गल्लोगल्ली शिवरायांचा गजर

Advertisements

खानापुरात सहाव्या-सातव्या दिवशीदेखील अभूतपूर्व प्रतिसाद : ठिकठिकाणी दौडीचे फुलांच्या वर्षावाने स्वागत

प्रतिनिधी /खानापूर

खानापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गा दौडमुळे शहरातील गल्लोगल्लीमध्ये शिवरायांचा गजर सुरू आहे. गेल्या सहा दिवसात शहरातील कानाकोपऱयामध्येही दौडचा आवाज घुमला. शनिवारी सहाव्या दिवशीच्या दौडची सुरुवात शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवरायांची अभिषेक पूजानगरसेवक विनायक कलाल, गुंडू तोपिनकट्टी, नगरपंचायतीचे कर्मचारी प्रेमानंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर ध्वजपूजन होऊन दौड न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनर, लक्ष्मी-नारायण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, दत्त मंदिर, अर्बन बँक दुर्गादेवी, भट गल्ली, बालाजी मंदिर तेथून चौराशी मंदिर येथे सांगता करण्यात आली.

 या दौडच्या स्वागतासाठी या दौडीच्या मार्गावरील सारे रस्ते रांगोळय़ानी सजविले होते. या संपूर्ण गल्लीत दौड फिरुन चौराशी मंदिराजवळ आली. त्या ठिकाणी आरती व प्रेरणा मंत्र होऊन सहाव्या दिवसाच्या दौडची सांगता झाली.

हत्तरगुंजी परिसरात दुर्गामाता दौडीचे भव्य स्वागत, संपूर्ण परिसर शिवमय

रविवारी सातव्या दिवशी पहाटे स्मारकातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीची डॉ. सोनाली सरनोबत, सुजाता बाबर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर सिद्धनाथ बाबर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर दौडीस प्रारंभ झाला. बुरुड गल्ली, चौराशी मंदिर येथून दादोबानगर येथे दौड आल्यावर दौडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी दादोबा नगरातील रस्त्यावर रांगोळी व फुलांच्या वर्षावात दौडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दौड डुक्करवाडी गावात आली. येथेही दौडीचे गावकऱयांनी स्वागत केले.

त्यानंतर दौड मुडेवाडी येथे आली. या ठिकाणीही गावकऱयांनी दौडीचे भव्य स्वागत केले. तेथून दौड हत्तरगुंजी गावात आली. या ठिकाणी दौडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. तोरण, पताका यांनी गाव भगवेमय झाले होते. गावातून दौड फिरुन आल्यानंतर दौडीची चव्हाटा मंदिर येथे प्रेरणा मंत्राने सांगता झाली. यावर्षी प्रथम डुक्करवाडी, दादोबानगर, हत्तरगुंजी या परिसरात दौड काढण्यात आली. त्यामुळे या भागातील युवक, युवती व गावकऱयांचा दौडीत मोठा सहभाग होता.

मंगळवार दि. 4 रोजी दौडचा मार्ग

शिवस्मारक, रुमेवाडी क्रॉस, मारुती नगर, श्री मारुती मंदिर, पारिश्वाड क्रॉस, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, कुप्पटगिरी येथे सांगता होणार आहे.

Related Stories

झोपडपट्टतील नागरिकांना आहारधान्य वितरण

Patil_p

आशाकिरण सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात

Patil_p

तरुण भारत कार्यालयाला प्रियदर्शन जाधव यांची सदिच्छा भेट

Omkar B

नवीन धोरणामुळे पर्यटन व्यवसायाला अधिक बळ

Omkar B

मैला काढण्यासाठी व्यक्तीचा वापर करणे गंभीर बाब

Amit Kulkarni

कुख्यात गुन्हेगारांना पुन्हा एकदा ‘आकाश’ मोकळे

Amit Kulkarni
error: Content is protected !!