Tarun Bharat

दुर्घटनांचा धोका होणार कमी

वाहतूक मंत्रालयाकडून ऍप सादर : दुर्घटनांच्या धोक्यांचा अलर्ट देणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात चालक आणि रस्तेसुरक्षा तंत्रज्ञानासाठी आयआयटी मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी ‘मॅपमायइंडिया’साठी  भागिदारी केली आहे. तिघांनी मिळून ‘फ्री-टू-यूज-नेव्हिगेशन ऍप सादर केला असून तो रस्त्यांवरील दुर्घटनांच्या धोक्यांबद्दल सेफ्टी अलर्ट देतो. नेव्हिगेशन ऍप चालकांना मार्गात येणारे संभाव्य दुर्घटनाप्रवण क्षेत्रे, गतिरोधक, तीव्र वळणे आणि खड्डय़ांसह अन्य धोक्यांविषयी आवाज आणि फोटो अलर्ट प्रदान करणार आहे. देशात रस्ते दुर्घटनांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या योजनेचा हा पुढाकार हिस्सा आहे.

रस्त्यांवर वाहने चालविणाऱया लोकांची सुरक्षा विचारात घेत हे ऍप सादर करण्यात आले असून याला मूव्ह नाव देण्यात आले आहे. यात अनेक प्रकारच्या रोड सेफ्टी फीचर्सही देण्यात आल्या आहेत.

मॅपमायइंडियाकडून विकसित नेव्हिगेशन सेवा ऍप ‘मूव्ह’ने 2020 मध्ये सरकारचा आत्मनिर्भर ऍप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले होते. या सेवेचा उपयोग नागरिक आणि अधिकाऱयांकडून दुर्घटना, असुरक्षित क्षेत्र, रस्ते आणि वाहतुकीच्या मुद्दय़ांना मॅपवर रिपोर्ट अणि प्रसारित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.  अन्य युजर्सच्या मदतीने डाटाचे विश्लेषण आयआयटी मद्रास आणि मॅपमायइंडियाकडून केले जाणार असून भविष्यात रस्त्याच्या स्थितीत सुधारणेसाठी सरकारकडून याचा वापर केला जाणार आहे.

वाहतूक मंत्रालयाने मागील महिन्यात अधिकृतपणे आयआयटी मद्रासच्या संशोधनातून निर्माण करण्यात आलेले डाटा-ड्रिवन रोड सेफ्टी मॉडेल स्वीकारले. रस्त्यांना सुरक्षित करणे आणि इमर्जन्सी रिस्पॉन्समध्ये सुधारणा करण्यास मदतीसाठी 32 हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदे संस्थेकडून विकसित रस्ते दुर्घटना डाटाबेस (आयआरएडी) मॉडेलचा अवलंब करणार आहेत.

आयआयटीच्या टीमने 2030 पर्यंत रस्ते दुर्घटनांमधील मृत्यू 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक रोडमॅप विकसित करण्यास मदत करण्यासाठी विविध राज्य सरकारांसोबत करारावर स्वाक्षरी केली आहे. रस्त्यांचा वापर करणाऱयांची सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनेक   उपाययोजना करत आहेत.

Related Stories

आधुनिक रस्ते बांधणीतून प्रगतीला गती!

Patil_p

मिग-21 कोसळले, पायलट बचावला

Patil_p

विरोधी सदस्यांचा राज्यसभेत गोंधळ

Patil_p

बेल, गूळ, चुन्यातून साकारतेय मंदिर

Amit Kulkarni

इस्रायल-युएई विमानसेवेला सौदीचा हिरवा झेंडा

Patil_p

‘लव्ह जिहाद’प्रकरणी आता हरियाणातही कडक कायदा

Patil_p