Tarun Bharat

दुर्लक्षित अनमोड महामार्गाचीअखेर गोव्याने केली डागडुजी

प्रवासी-वाहनधारकांना दिलासा

वार्ताहर / रामनगर

गोवा-बेळगाव महामार्गावर तिनईघाटपासून अनमोडपर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने अडकून बसत होती. दोन दिवसांपूर्वी सतत दोन्ही बाजूंनी 500 ते 600 वाहने अडकून राहिल्याने वाहनचालकांना उपाशीपोटी रहावे लागले. याशिवाय वाहनांचेही मोठे नुकसान झाले. यामुळे गोवा येथील पदाधिकाऱयांनी सोमवारपर्यंत कर्नाटकातील संबंधित खात्यातील अधिकाऱयांनी अथवा लोकप्रतिनिधींनी डागडुजी न केल्यास आपण रस्ता दुरुस्ती करू, असा इशारा दिला होता.

सोमवारपर्यंत महामार्ग दुरुस्तीसाठी कर्नाटककडून कोणतीच हालचाल झाली नाही. शेवटी कंटाळून गोव्यातील शासकीय अधिकारी व टिप्पर असोसिएशनने मार्गावरील मोठाले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती हाती घेतली. सदर मार्गाच्या दुरुस्तीसाठी गोव्यातून बाराचाकी ट्रक्समधून सामग्री आणण्यात येत होती. कर्नाटकच्या हद्दीतील रस्ता गोव्यातील अधिकारी आणि नागरिकांनी दुरुस्ती करण्यास सुरुवात केल्याने येथून ये-जा करणाऱया प्रवाशांनी आणि वाहनधारकांनी अक्षरशः हात जोडून त्यांचे आभार मानले.

पावसामुळे कामात व्यत्यय

गोव्यातर्फे रस्ता दुरुस्ती केली जात असल्याचे कळताच कारवार विधान परिषद सदस्य श्रीकांत घोटणेकर यांनी सदर ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी सदर मार्ग करण्यासाठी 3 ते 4 चार दिवसांचा कालावधी लागणार असून सततच्या पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याचे सांगितले.

Related Stories

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

सावित्रीबाई फुले यांचे योगदान अतुलनीय

Patil_p

बसस्थानकात पार्किंगअभावी प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

नागरिकांना वाढीव दराने पाणीपट्टी

Omkar B

मुंबईहून येणाऱ्या लोकांवर कर्नाटक सरकारचे विशेष कोविड पाळत ठेवण्याचे आदेश

Abhijeet Khandekar

बेळगावात एकाच दिवशी जैन मुनी यांना यमसल्लेखन पूर्वक तर आर्यिका यांचे समाधी मरण

Patil_p