Tarun Bharat

दुसरया दिवशीही लॉकडाऊनला प्रतिसाद

कराड, मलकापुरात रस्ते निर्मनुष्य,पोलिसांचा खडा पहारा

प्रतिनिधी/ कराड

शुक्रवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला कराड, मलकापुरात शनिवारीही प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. पोलिसांनी रात्रंदिवस खडा पहारा देत वाहन तपासणी सुरूच ठेवली होती. 

दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडून बंदोबस्ताचा आढावा घेतला. 

कराड, मलकापुरसह सैदापुरात पोलिसांनी शुक्रवारपासून कडक बंदोबस्त ठेवला आहे. सात ठिकाणी चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत. शनिवारीही पहाटेपासून वाहन तपासणी सुरू होती. शनिवारी दिवसभरात पोलिसांनी 89 वाहनांवर कारवाई केली होती. त्यानंतरही कारवाईची मोहिम सुरूच होती. 

कराड शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कराडकरांनी लॉकडाऊनचे कडक पालन केलेले दिसून आले. शनिवारी दिवसभर रस्त्यांवर सन्नाटा होता. अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता कोणीही दिसत नव्हते. मात्र तरीही पोलिसांनी वाहन तपासणी सुरू ठेवली होती. औषधांची दुकानेही बरोबर दोनच्या ठोक्याला बंद झालेली होती. शहरातील बाजारपेठ, चावडी चौक परिसर, मंडई परिसर, बसस्थानक, दत्त चौक, कार्वेनाका परिसरातही बंदला प्रतिसाद मिळाला. मलकापूर शहरात रूग्ण सापडत असल्याने मलकापुरवासियांनीही कडकडीत बंद पाळला. नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात होते. सैदापूर भागातही कडकडीत बंद होता. या भागात साडलेल्या रूग्णांची हिस्ट्री सापडत नसल्याने प्रशासन हादरले आहे. नागरिकांनीही चांगलीच खबरदारी घेत लॉकडाऊनचे कडक पालन केल्याचे दिसून आले.

Related Stories

सेनेचे 10 खासदारही बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदाराचा दावा

datta jadhav

खाद्य तेल भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करा – राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

कास परिसरातले लोक जगले पाहिजेत

datta jadhav

तब्बल १२ वर्षानंतर सराईत गुन्हेगारास लागणार मोक्का

Archana Banage

राज्यसभा माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन

Archana Banage

दिल्ली धावतेय, सातारा बंद का?

Patil_p