Tarun Bharat

दुस-या मजल्यावरून पडून हिंडलगा येथील तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव :

फिट्स येऊन दुसऱया मजल्यावरून पडून लक्ष्मी गल्ली-हिंडलगा येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास कडोलकर गल्लीत ही घटना घडली. उपचारासाठी डॉक्टरकडे गेला असता फिट्स येऊन इमारतीवरून पडून त्या तरुणाचा मृत्यू झाला.

रोहन राजू कुप्पेकर (वय 27, रा. लक्ष्मी गल्ली-हिंडलगा) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, काका, बहिणी असा परिवार आहे. रोहन गुरुवारी सकाळी आपल्या वडिलांसमवेत कडोलकर गल्ली येथे उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला होता. दुसऱया मजल्यावर तो थांबला होता. त्यावेळी फिट्स येऊन इमारतीवरून खाली पडला. त्याच्या डोक्मयाला व पायांना जबर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी इस्पितळात हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर खडेबाजार पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून त्याला फिट्स येत होती. त्याच्यावर उपचारही सुरू होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

Related Stories

एमबीबीएस परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Patil_p

बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्कारांचे वितरण

Patil_p

रेल्वेमार्गादरम्यान गटारीची रुंदी वाढवा

Amit Kulkarni

अधिकाऱयांनो, शहराचा फेरफटका एकदा तरी मारा!

Patil_p

मंत्रिमहोदयांच्या स्वागतासाठी फडकविला तिरंगा

Amit Kulkarni

जमखंडी बेटी बचाओ

Patil_p