Tarun Bharat

दुहेरी खुनाने कराड परिसर हादरला

महिलेसह दोन वर्षीय बालकाचा निर्घृण खून; अनैतिक संबधातून कृत्याचा संशय

प्रतिनिधी/ कराड

कराड शहरालगतच्या वारुंजी येथे महिलेसह दोन वर्षांच्या बालकाचा खून करून हल्लेखोर पसार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दोन दिवसापूर्वी एका खोलीत अत्यंत निर्दयीपणे अन् शांत डोक्याने चिमुकल्या मुलासह महिलेला संपवून संशयित पसार झाला. दोघांचे मृतदेह एका बॅगेत भरून विल्हेवाट लावण्याचा संशयिताचा प्रयत्न फसल्याने तो खोली बंद करून पळाला. अनैतिक संबंधातूनच हे क्रूर कृत्य घडल्याचा संशय व्यक्त करत संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने वारूंजी परिसर पुरता हादरून गेला. 

 सुशीला सुनील शिंदे (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून या दुर्दैवी घटनेत विराज निवास गायकवाड (वय 2) या चिमुकल्याचा हकनाक बळी गेल्याने नातेवाईकांनी घटनास्थळी भिंतीवर डोके आपटून घेत अक्षरशः आक्रोश केला. दरम्यान हे क्रुर कृत्य करणारा संशयित अरविंद सुरवसे याच्या शोधासाठी कराड पोलिसांनी आपले कसब पणाला लावले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराडलगत विमानतळ परिसरात मृत सुशीला शिंदे ही महिला आईसमवेत राहात होती. सुशिलाच्या बहिणीचा मुलगा विराज हा सुद्धा आज्जी व मावशीसमवेत राहात होता. सुशीलाचे लग्नग्न झाले होते, मात्र ती पतीसमवेत राहात नव्हती.  काही दिवसांपूर्वी सुशीला कामासाठी बाहेर जात होती. वारूंजी येथील सत्यजीत पतसंस्थेच्या पाठीमागील गजबजलेल्या कॉलनीत अरविंद सुरवसे राहात होता.

अरविंद आणि सुशीलाची ढाब्यावर ओळख

 अरविंद एका ढाब्यावर काम करत होता. त्याच ठिकाणी सुशीला व अरविंद यांची ओळख झाली असावी. यातून त्यांच्यात अनैतिक संबध सुरू झाले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे संबंध कुटुंबातील काही लोकांना समजल्याने तिला घराबाहेर पडण्यास कुटुंबियांनी विरोध केला असावा. शनिवारी सकाळी सुशीला ही  बहिणीचा मुलगा विराजला घेऊन सकाळी विमानतळावरील घरातून बाहेर गेली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. दरम्यान याच काळात सुशीला आणि अरविंद हे विराजला दुचाकीवरून घेऊन जाताना काही नागरिकांनी पाहिले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला मात्र ते न सापडल्याने नातेवाईकांनी कराड पोलीस ठाणे गाठले                        .   

अरविंद, सुशीलावर विराजच्या अपहरणाचा गुन्हा

  नातेवाईकांनी सुशीला व विराज बेपत्ता असल्याबाबतची तक्रार सोमवारी 23 ऑगस्ट रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. नातेवाईकांनी जो घटनाक्रम सांगितला त्यावरून बी. आर. पाटील यांनी अपहरणाचा गुन्हा नोंद दाखल  करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार दोन वर्षीय विराजच्या अपहरणाचा गुन्हा सुशीला शिंदे व अरविंद सुरवसे यांच्यावर दाखल झाला. या दोघांनी विराजला घेऊन जाताना अनेकांनी पाहिल्याने पोलीस त्या दृष्टीने तपासाच्या कामाला लागले. दरम्यान, सोमवारी रात्री संशयित अरविंद सुरवसे राहात असलेल्या वारुंजी येथील सत्यजित पतसंस्थेच्या पाठीमागे असलेल्या खोलीमधून दुर्गंधी यायला लागली.    

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहून शेजारी हादरले

अरविंद रहात असलेल्या खोलीच्या परिसरात रविवारी रात्रीनंतर दुर्गंधी वाढली.

तरीही शेजारी व घर मालकांनी ड्रेनेज लिकेज असेल या शक्यतेने दुर्लक्ष केले. दरम्यान मंगळवारी सकाळी जास्त प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने सतर्क झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. शिवाय अरविंदच्या बंद खोलीचा दरवाजा उघडल्यावर आतील भयानक चित्र पाहून सर्वजण अक्षरशः हादरले. रक्ताच्या थारोळ्यात सुशीलाचा मृतदेह पडलेला होतात तर शेजारीच विराजचा निपचीत अवस्थेत मृतदेह होता. 

दुर्गंधी अन् क्रुरता पाहून पोलीसही चक्रावले

दुहेरी खुनाच्या घटनेने वारूंजी परिसर पुरता हादरून गेला. या घटनेची माहिती शेजारी कळताच प्रत्येक घरातील, अपार्टमेंटच्या फ्लॅटमधील नागरिक, महिला भेदरलेल्या अवस्थेत घटनास्थळाकडे पहात होते. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी होता. पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून 100 फूट अंतरापर्यंत माग काढला. घटनास्थळी व मृतदेहाजवळ उग्र वास येत असल्याने फारसे कोणी जवळ जात नव्हते..

पुरावा नष्ट करण्याचा खटाटोप फसला

संशयिताने सुशीलावर चाकूने  वार करून तिला संपवल्याचे दिसत होते. त्यामुळे सुशीलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विराजचा गळा दाबून खून झाल्याचे दिसत होते. हे क्रुर कृत्य अंदाजे दोन दिवसापूर्वीच झाल्यामुळे मृतदेह  सडलेले झाले होते. दरम्यान संशयिताने खून केल्यानंतर एका बॅगेत सुशीलाचा मृतदेह भरण्याचा खटाटोपही केल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी सांगितले. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला होता. तर  खोलीतील बाथरूमच्या कठडय़ावरती चाकू पाण्यात धुवून ठेवलेला दिसत होता. तरी सुद्धा चाकूला रक्ताचे डाग होते. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसल्याने संशयिताने तेथून पळ काढला. 

मावशीच्या संबधांने घेतला विराजचाही बळी? सुशीला विराजला घेऊन बाहेर पडली होती मात्र नेमकी ती कुठे गेली याची माहिती कुटुंबाला नव्हती. मावशी सुशीलाबरोबर गेलेल्या विराजचाही क्रुरपणे खून झाल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. विराजचे चुलते पोलिसांसमोर आक्रोश करत बाळ जसे असेल तसे मला द्या, मी त्याला सांभाळतो, अशी काळीज पिळवटून टाकणारी विनवणी करत होते. तेव्हा पोलिसांसह शेजारच्यांच्या डोळ्यातही पाणी

Related Stories

कराडकरांकडुन लष्करी अधिकाऱयांना श्रद्धांजली

Patil_p

सोमवारी अहवालात 50 जण बाधित

datta jadhav

शहर पोलिसांनी तीन गुह्यांची केली उकल

Patil_p

बाधित वाढ मंदावली

datta jadhav

एकही बालक पोलिओ लसीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

Archana Banage

बॅरिगेटस्मुळे कराड शहरात भुलभुलैय्या

Amit Kulkarni