Tarun Bharat

दुहेरी जलवाहिनीमुळे ऊस उत्पादनावर परिणाम

रजनीश जोशी/सोलापूर :

दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर भीमा नदीकाठच्या ऊस क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्मयता आहे. कारण सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत वर्षभरात किमान चारवेळा पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱयांना पाणी मिळते. जलवाहिनीचे काम झाल्यावर भीमेतील पाणी बंद होईल, तेव्हा ऊसक्षेत्रावर प्राधान्याने विपरित परिणाम होणार आहे.

उजनी धरण ते सोलापूर अशी यशवंत जलाशय योजना सध्या कार्यरत आहे. पाण्याचे नियोजन नीट नसल्याने या योजनेतून सोलापूरकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे धरणापासून सोलापुरापर्यंत दुसरी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामाकरिता 449 कोटी 64 लाख इतका खर्च होणार आहे. त्यातील अडीचशे कोटी राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्प (एनटीपीसी) देणार आहे तर उर्वरित दोनशे कोटी स्मार्ट सिटी प्रकल्पातून मिळणार आहेत. पंधरा महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

ऊस उत्पादकांना सतर्कतेची गरज

सोलापूर जिह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. त्यातील बहुतांश कारखाने भीमा पट्ट्यात आहेत. या कारखान्यांना दिला जाणारा ऊस भीमेकाठी पिकतो. पावसाळय़ाव्यतिरिक्त सुमारे चारवेळा उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे जवळपास चार महिने पात्रात पाणी राहते. नदीकाठच्या शेतकऱयांना ते ऊस व अन्य पिकांसाठी उपयोगी पडते. दुहेरी जलवाहिनीमुळे भीमेकाठचे शेतकरी अडचणीत येण्याची शक्मयता आहे. त्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. भीमेकाठच्या शेतकऱयांनी आतापासून जागरूकता न दाखवल्यास येत्या काळात मोठे जलसंकट उभे राहू शकते.

नदीवरील पाणी योजना अडचणीत

भीमा नदीवरून शिरभावीसह अनेक पाणीयोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे त्याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे. उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद उजनीच्या मूळ आराखड्यात नाही. या योजनांसाठी पाणी देण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी जलसंपदा खात्याकडून गांभिर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दुहेरी जलवाहिनी सोलापूरकरांसाठी उपयुक्त पण नदीकाठच्या शेतकऱयांसाठी घातक ठरेल.

दीड वर्षात काम पूर्ण : धनशेट्टी

दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचा आमचा इरादा आहे. संपूर्ण कामासाठी लागणारी आर्थिक तरतूद पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या तरी कोणतीही अडचण नाही.

संजय धनशेट्टी, अभियंता, सोलापूर महापालिका परिस्थितीचा अभ्यास करू : भालके

दुहेरी जलवाहिनीमुळे ऊस क्षेत्रावर परिणामाची शक्मयता वर्तवली जात आहे. नेमका प्रकार काय आहे. ऊस उत्पादकांवर काय परिणाम होईल, याविषयी मी विचार करीत आहे. सध्या मुंबईत आहे, पंढरपुरात आल्यावर तपशील पाहतो.

भारत भालके, आमदार

पहिल्या जलवाहिनीचे भवितव्य काय? : वडगबाळकर

नवी जलवाहिनी घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण जुन्या जलवाहिनीची सध्याची स्थिती बिकट आहे. तिची डागडुजी कधी करणार, अन्यथा नवी जलवाहिनी तयार झाली की जुनी बंद पडेल. म्हणजे पर्यायाने एकाच जलवाहिनीवरून पुरवठा केला जाईल. म्हणजे येरे माझ्या मागल्यासारखी स्थिती.

Related Stories

बोट पलटल्याने ११ जण नदीत बुडाले

Archana Banage

अहमदनगरमध्ये एसटीलाच गळफास घेत चालकाची आत्महत्या

Archana Banage

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱयाला सहा महिन्यांची कैदेची शिक्षा

Patil_p

अभावीपतर्फे शैक्षणिक मुद्द्यांबाबत माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन

Archana Banage

मोळाचाओढा रस्त्यावरील अरुंद पुल देतोय अपघातांना निमंत्रण

Patil_p

खटाव तालुक्यातील मदने टोळीला मोक्का

Patil_p