Tarun Bharat

दूधगंगा कालव्यात पडले गवे

प्रतिनिधी / सरवडे

काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी पिण्यासाठी उतरलेला गव्यांचा कळप पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. कालव्याला प्लास्टर असल्याने गव्यांना वरती चढता येईना. त्यामुळे हवेत पाण्यातून सुमारे अर्धा किलोमीटर वाहत गेले. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. कालव्यावर फिरावयास गेलेल्या उंदरवाडीच्या तरुणांनी गवे वाहत जाताना पाहिले, त्यांना हुसकावून गवे वर निघण्याचा प्रयत्न केला. परंतु प्लास्टरमुळे गव्यांना वर चढता येत नव्हते.

आज सकाळी आठ – दहा गव्यांचा कळप कालव्यात पाणी पिण्यासाठी उतरला. पाण्याला अधिक वेग असल्याने सरवडेच्या हद्दीत उतरलेले गवे सुमारे अर्धा किलोमीटर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. कालव्याला प्लास्टर असल्याने गव्यांनावर चढता येईना. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत उंदरवाडी व सरवडे दरम्यान कालव्यावर पूल बांधण्यासाठी सोडलेल्या जागे पर्यंत आले. त्याठिकाणी प्लास्टर नसल्याने गव्यांना वर चढण्यासाठी जागा मिळाली. त्याठिकाणाहून गवे वर चढून जंगलाकडे गेले.

Related Stories

बँक योजनांसाठी जिल्ह्यातील बँकांचा मेळावा

Archana Banage

प्रथम हद्दवाढ, मगच निवडणूक

Abhijeet Khandekar

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा लांबणीवर

Archana Banage

आरोग्य विभागातील कामचुकारांचे धाबे दणाणले

Archana Banage

बिबट्या नरभक्षक नाही

Archana Banage