Tarun Bharat

दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

सरकारला सद्बुद्धी येऊ दे, महादेवाला घातले साकडे

सोलापूर /प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली.

महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे. माहाविकास आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे ही विदारक परिस्थिती आज राज्यात आहे, येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांनी यावेळी दिला.

दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेकसरकारला सद्बुद्धी येऊ दे, महादेवाला घातले साकडेतरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली.

Posted by Tarun Bharat Daily on Friday, July 31, 2020
दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे ब्रीच कँडीत

Archana Banage

एकादशीला विनापरवाना सोळा विठ्ठलभक्त पंढरीत दाखल

Archana Banage

मराठा आरक्षण मुद्दा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात पेटण्याची शक्यता

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 6 बळी, 269 पॉझिटिव्ह

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णाचा पहिला मृत्यू

Archana Banage

अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात ठोकला 100 कोटींचा दावा

datta jadhav