Tarun Bharat

दूध विक्रेत्यांना पोलिसांचा त्रास

बेळगाव / प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ठराविक नियमावली व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूत किराणा मालासह दुधाचाही समावेश आहे. मात्र गणेशपूर पाईपलाईन परिसरातील दूध डेअरी व किराणा दुकानदारांना पोलिसांकडून त्रास देण्यात येत आहे. दुकाने लवकर बंद करा म्हणून एकप्रकारे दबाव तंत्र सुरू आहे. याचा फटका दुकानदारांसह या भागातील नागरिकांना बसत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी येथील दुकानदार आणि नागरिकांनी केली आहे.

गणेशपूर पाईपलाईनचा भाग ग्रामीण भागाला लागून आहे. यामुळे येथील दूध संकलन केंद्रात मंडोळी, बेनकनहळ्ळी आदी ग्रामीण भागातील दूध उत्पादक दररोज सकाळ-संध्याकाळ दूध पुरवठा करतात. काहीवेळा त्यांच्याकडून दूध पुरवठा करण्यास विलंब होत असतो. 8.30 पर्यंत दूध संकलित करण्याचे काम सुरू असते. मात्र त्या आधीच दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांकडून दबावतंत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनाही दूध मिळविण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. एकीकडे प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तूंसह दूध पुरवठा करण्यावर निर्बंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पाईपलाईन भागातील दूध विपेत्यांना पोलिसांकडून जाणूनबुजून त्रास देण्याचे काम सुरू आहे.

येथील विपेते नियमांचे पालन करून आणि सुरक्षित अंतर ठेवूनच ग्राहकांना दुधासह किराणा साहित्याची विक्री करत आहेत. मात्र संबंधित पोलीस स्थानकातील पोलीस या भागातील दुकानात घुसून व्हिडिओ चित्रीकरण करण्याची धमकी देऊन विपेत्यांना दुकाने लवकर बंद करावीत, यासाठी दबाव घालत आहेत. एकीकडे जीवनावश्यक साहित्याची विक्री करणाऱयांविरूद्ध पोलिसांची दादागिरी सुरू असताना याच भागातील चिकन व मटण विपेत्यांकडून चोरटय़ामार्गाने चिकन-मटणची विक्री सुरू आहे. त्यांच्याकडे मात्र पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

Related Stories

बिजगर्णी ग्रा.पं.ला विशेष अनुदान द्या : ग्रा.पं. सदस्यांची मागणी

Amit Kulkarni

बाधितांच्या नातेवाईकांना सिव्हिलमध्ये प्रवेशबंदी

Amit Kulkarni

शिवाजी हायस्कूलच्या खो खो पटूंचा गौरव

Amit Kulkarni

दारूसह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

Amit Kulkarni

24 तासात केवळ 3 नवे रुग्ण बेंगळूरमध्ये गर्भवतीचा मृत्यू

Tousif Mujawar

म.ए.समितीकडून शिक्षणाधिकारी धारेवर

Amit Kulkarni