Tarun Bharat

दूध संघासमोरील रस्त्यावर चालता डंपर पेटला

Advertisements

जिवीतहानी नाही : घटनास्थळी अग्नीशामक, पोलीस तत्काळ दाखल

प्रतिनिधी/ सातारा

सातारा दूध संघासमोरील रस्त्यावरून निघालेला डंबर (क्रं. एमएच 50 एन 6262) ला आग लागली. ही आग बघून तत्काळ अग्नीशामक दलाला कळविण्यात आले. अग्नीशामक दलाने घटनास्थळी पोहचून आग ओटक्यात आणली.

 शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सातारा दूध संघ येथून डांबराची बारीक खडी घेऊन डंपर निघाला होता. यावेळी अचानक डंपरच्या टायरमधून धूर येण्यास सुरूवात झाली. डंपरच्या टायरने पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. बघ्यांनी गर्दी करत परिसरात गोंधळ निर्माण झाला. यांची माहिती अग्नीशामक दलाला मिळताच आग विझविण्यासाठी गाडी घटनास्थळी दाखल झाली. संतोष खुडे, अरुण कार्वे, सुनिल निकम, तोशिफ सय्यद, संदीप सावनोर या कर्मचाऱयांनी तत्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. टायर पंक्चर झाल्याची माहिती चालकाला नव्हती. यामुळे टायरने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती अग्नीशामक दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Stories

बालाजी लॅबकडून कॉमन पॅसेजमध्ये कोरोना टेस्टिंग

datta jadhav

ऐकीव धबधब्यावर पर्यटकांच्या कोरोना टेस्ट

datta jadhav

सातारा : मंदिर सेवेकऱ्याचा भक्तांना अडीच लाखाला गंडा

Abhijeet Shinde

जरंडेश्वर कारखान्यात स्फोट; एकाचा मृत्यू

Patil_p

साताऱयात बर्थ डे बॉयसह 10 मुलांवर गुन्हा

Amit Kulkarni

आयुष प्रणालीद्वारे ‘पन्नास’ वरील नागरिकांना औषधे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!