नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमधील भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांनी 5-जी तंत्रज्ञानांच्या परिक्षणासाठी (5-जी चाचणी) अर्ज दाखल केले आहेत. सदरच्या चाचणीसाठी एअरटेलकडून देशातील 5-जी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी हुआई, जेडटीइ, ऍरिक्सन आणि नोकिया यांचीसोबत घेण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे जिओने या चाचणीसाठी सॅमसंगसोबत हातमिळवणी केली आहे अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील सुत्राकडून देण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील 5-जी नेटवर्कचे परिक्षण करण्यासाठी सरकार स्पेक्ट्रम देणार असल्याचे मागील महिन्यात दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते


previous post