Tarun Bharat

दृष्टीहीन हिमानी ज्ञानाचा सागर

Advertisements

कोन बनेगा करोडपती या लोकप्रिय सामान्य ज्ञान कार्यक्रमात 1 कोटी रुपये जिंकणारी हिमानी बुंदेला सध्याला चर्चेत आहे. विशेष म्हणजे सामान्य ज्ञानाचा सागर म्हणून ओळखली जाणारी हिमानी दृष्टीहीन आहे. अशा स्थितीतही तिने कोन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेण्याचे साहस दाखविले. तसेच यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. दृष्टीहीन असल्याने इतक्या मोठय़ा प्रमाणात विविध विषयांचे ज्ञान मिळविणे. हे खरोखरच अतिशय अवघड काम होते. पण तिने निर्धार आणि कष्ट यांच्या जोरावर ते यशस्वीरित्या केले आहे.

हिमानीच्या कोन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमाचे प्रसारण 30 आणि 31 ऑगस्ट या दिवशी होणार आहे. मात्र त्याचे चित्रिकरण आधीच झालेले आहे. आणि हिमानीने 1 कोटी रुपये जिंकले असल्याचेही घोषित करण्यात आले आहे. लहानपणीच एका अपघातात हिमानीने दृष्टी गमाविली. तिला खरे तर डॉक्टर व्हायचे होते तथापि या अपघातामुळे ते शक्य नव्हते. तिचे आई वडील आणि इतर नातेवाईकांनी तिने दृष्टी गमाविल्यानंतर तिला मोठा धीर दिला. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून ऑडिओ पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास केला. तसेच टॉकिंग सॉफ्टवेअरचेही साहाय्य घेतले. 2017 मध्ये तिने बीएड्ची परीक्षा यशस्वीरित्या दिली. सध्या ती एका शाळेत गणिताची शिक्षिका आहे. कोन बनेगा करोडपतीमध्ये तिने मिळविलेले यश केवळ दिव्यांग व्यक्तिनाच नव्हे तर शारीरिक दृष्टय़ा सुदृढ व्यक्तिंनाही प्रेरणादायी ठरणारे आहे. हे निश्चित आहे.

Related Stories

सरकारी कर्मचाऱयांच्या अनावश्यक खर्चाला आळा

Patil_p

महाराष्ट्र पेचप्रसंगावर सुनावणी 13 जानेवारीला

Patil_p

ऑगस्ट महिन्यातच तिसऱ्या लाटेची धडक

Patil_p

कोरोना उद्रेकातील वाढ चिंताजनक

Patil_p

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत जाहीर

Archana Banage

कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा DCGI कडे

datta jadhav
error: Content is protected !!