Tarun Bharat

देगाव फाटय़ावरील गादी दुकानास आग

Advertisements

प्रतिनिधी/सातारा

येथील देगाव फाटय़ावर असलेल्या भंडारे हाईट्स या इमारतीत असलेल्या ओम साई कुशनच्या दुकानास शॉर्टसर्किटने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले. स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला ही आग आटोक्यात आणण्यासाठी लगेच प्रयत्न केले. दरम्यान, सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब, कुपर कारखान्याच्या बंबाने ही आग प्रयत्नाने आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, देगाव फाटा येथील भंडारे हाईट्स या इमारतीमध्ये राजाराम मोहिते यांचा गाळा आहे. त्या गाळय़ात माणिक यादव यांनी गादीचे दुकान सुरु केले होते. त्या दुकानामध्ये गादी तयार करण्याचे व विक्रीचे काम केले जात असे. बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. बघताबघता आगीने दुकानातील गादीचे साहित्य, फोमने पेट घेतला. या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी लगेच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हंडे, कळशा घेवून प्रयत्न सुरु केले. प्रथमच आग आटोक्यात आणण्यासाठी कुपर कंपनीचा अग्निशमन दलाचा बंब तेथे पोहचला. त्यानंतर पालिकेचा अग्निशमन दलाचा बंब पोहचला. दोन्ही बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत दुकानाचे पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.

स्थानिक नेत्यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी केला प्रयत्न

येथील स्थानिक नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समितीचे सदस्य रामदास साळुंखे यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, तलाठी दीपक गौंड यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आगीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती.

Related Stories

इंग्लडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही; हर्षल सुर्वेंचा इशारा

Archana Banage

सातारा जिल्ह्यात 809 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Archana Banage

कोरोना : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.25 % वर

Tousif Mujawar

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी

Patil_p

हा टाईमपास कशाला?, निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

Archana Banage

परीक्षा घ्या अन्यथा खुर्चा खाली करा, एमपीएससी परीक्षार्थींच्या भावना तीव्र

Archana Banage
error: Content is protected !!